महाविकास आघाडीवर जनतेचा विश्वास सिद्ध झालाय – आदित्य ठाकरे

Aditya Thackeray

मुंबई :- राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. या सर्व ग्रामपंचायत निवडणुकांची मतमोजणी होते आहे. राज्यातील 14,234 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका (Gram Panchayats Elections) जाहीर झाल्या होत्या. मात्र, त्यापैकी 1,523 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. राज्यातील पहिला निकाल सकाळी पावणे नऊच्या सुमारास जाहीर झाला.राज्याच्या अनेक ग्रामपंचायतीत शिवसेनेने (Shivsena) बाजी मारली आहे.

ग्रामपंचायत निवडणुक निकालावर प्रतिक्रिया देताना महाविकास आघाडीवर जनतेचा विश्वास सिद्ध झालाय असे राज्याचे पर्यावरण मंत्री, शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी म्हटले आहे.

शिवसेनेची जोरदार घौडदौड

महाविकासआघाडीने (Mahavikas Aghadi) एकत्र निवडणूक लढवल्याचा मोठा फायदा शिवसेनेला मिळाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातही शिवसेनेला मोठे यश मिळताना दिसत आहे. आतापर्यंत ज्या भागांमध्ये शिवसेनेला यश मिळाले नव्हते तेथेही सेनेचा शिरकाव झाल्याचे पाहायला मिळत आहे. ही बाब शिवसेनेसाठी सकारात्मक मानली जात आहे.

ही बातमी पण वाचा : शिवसेनेच्या राष्ट्रीय विस्तारासाठी पश्चिम बंगालमध्ये ‘हीच ती वेळ’ – संजय राऊत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER