लोक मला ‘आमचे लाडके मुख्यमंत्री’ म्हणतात; पण मला लाड नको, तुमचे आशीर्वाद हवे- मुख्यमंत्री

CM Uddhav Thackeray

औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते आज औरंगाबादमधील पाणी पुरवठा योजनेसह चार महत्त्वाच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर झालेल्या छोटेखानी सभेद्वारे त्यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी औरंगाबादच्या विकासकामावर भाष्य केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, निवडणुका आल्या म्हणून मी विकासकामे करायला आलो नाही.

कोविडमुळे ही कामे रखडली होती. आता थोडा प्रादुर्भाव कमी झाला आहे. मलाही विकासकामांची घाई झाली आहे. औरंगाबादचा विकास वेगाने करायचा आहे. केवळ भूमिपूजन झालं. कुदळ मारली असं करायचं नाही. काम पूर्ण करायचं आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. लोक मला आमचे लाडके मुख्यमंत्री म्हणतात. पण मला लाड वगैरे नको आहे. मला केवळ तुमचे आशीर्वाद हवे आहेत, असं ते म्हणाले. तसेच, मुख्यमंत्री म्हणाले, कोरोना काळात मी घरात बसून कामं केली, असंही त्यांनी सांगितलं. तसेच पाणी पुरवठा योजना आता मार्गी लागली आहे. आता शहरातील गुंठेवारीचा प्रश्नही सोडवण्यात येईल, असं आश्वासनही त्यांनी दिलं.

औरंगाबादविषयी बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, इतके दिवस मला या शहराने खूप काही दिलं. आता मला काम करण्याची घाई लागली आहे. या शहराचा मला वेगाने विकास करायचा आहे. केवळ भूमिपूजन झालं. कुदळ मारली म्हणजे झालं असं नाही. मी काम पूर्ण करणारच आहे, असंही ते म्हणाले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले. रिमोटद्वारे हे उद्घाटन करण्यात आले.

त्यावर त्यांनी मार्मिक भाष्य केलं. ज्यांच्या हातात सत्तेचं रिमोट कंट्रोल होतं, ज्यांची ओळख रिमोट कंट्रोलमुळे होत होती, त्यांच्या नावानं  असलेल्या उद्यानाचं  रिमोटद्वारे उद्घाटन करावं लागतंय, असं मुख्यमंत्री म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER