१८ ते ४४ वर्षांच्या लोकांना लसीकरणासाठी आता नोंदणीची गरज नाही

vaccination - Maharastra Today

नवी दिल्ली :- देशात कोरोना (Corona) विरुद्धचा लढा तीव्र करताना लसीकरणावर भर देण्यात येत आहे. ४५ वर्षांवरील लोकांना नोंदणी न करता लसीकरण केले जात आहे. मात्र, १८ ते ४४ वर्षांच्या लोकांसाठी कोविन अ‍ॅपवर नोंदणी करणे बंधनकारक होते. मात्र आता १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना कोरोनाची लस घेण्यासाठी नोंदणी करण्याची गरज भासणार नाही. थेट लसीकरण केंद्रावर जाऊन या गटातील व्यक्तिंना लस घेता येणार आहे. त्यामुळे कोविन अ‍ॅपवर नाव नोंदणी करून अपॉईंटमेट घेण्याच्या कटकटीतून सुटका होणार आहे. केंद्र सरकारने नवे नियम जारी केले असून त्यात हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने १८ वर्षांवरील लोकांना व्हॅक्सिनबाबतच्या नियमात बदल केला आहे. या नवीन नियमानुसार नोंदणी न करता थेट लसीकरण केंद्रावर डोस घेता येणार आहे. १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तिंना लसीकरणासाठी ऑनसाईट रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. ते थेट लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेऊ शकतात. दरम्यान, त्यांना कोविन अ‍ॅप या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे.

रोज लस देण्याची वेळ संपेल आणि शेवटी ज्या लस उपलब्ध राहतील त्या ऑनसाईट व्यवस्थेनुसार लोकांना दिल्या जातील. त्यामुळे लस वाया जाणार नाहीत. त्याचा उल्लेख कोविन प्लॅटफॉर्मवर केला जाणार आहे. ही नवीन सुविधा केवळ व्हॅक्सिनेशन सेंटरवरच असेल. अनेकदा व्हॅक्सिनचा स्लॉट बुक केल्यानंतरही अनेक लोक व्हॅक्सिन घेण्यासाठी सेंटरवर येत नाही. त्यामुळे लस वाया जात असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button