बॉलिवूडशी नातं सांगणारे वांद्रे पूर्वेला राहतात ; आशिष शेलारांचा आदित्य ठाकरेंना टोला

Aditya Thackeray-Ashish Shelar

मुंबई : “बॉलिवूडशी नातं सांगणारे वांद्रे पूर्वेला राहतात” असं म्हणत भाजपा आमदार आशिष शेलार यांनी नाव न घेता राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंवर (Aditya Thackeray) निशाणा साधला . अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (SSR) मृत्यू प्रकरणात विरोधकांकडून वारंवार आदित्य ठाकरेंकडे बोट दाखवलं जाते आहे. यावर एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या प्रश्न महाराष्ट्राचे.. उत्तरे नेत्यांची या कार्यक्रमात आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले .

“वांद्रे पश्चिम हा बदनाम मतदारसंघ नसून तिथे प्रामाणिक मतदार राहतात. बॉलिवूडचे अनेक लोक तिथे राहतात मी बॉलिवूडच्या पार्ट्यांना जातो असं पत्रक हे लोक काढत नाहीत. बॉलिवूडशी संबंध आहेत असं पत्रक काढणारे वांद्रे पूर्वेला राहतात” असं म्हणत आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंचं नाव न घेता त्यांना टोला लगावला आहे.

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या संदर्भातील आक्षेपार्ह व्यंगचित्र व्हॉट्सअ‍ॅपवर फॉरवर्ड केले म्हणून शिवसैनिकांनी या अधिकाऱ्याला मारहाण केली. या मुद्द्यावरही शेलार यांनी टीका केली. गुंड प्रवृत्तीचे लोक सध्या सत्तेत आहेत असं शेलार यांनी म्हटले आहे.

ही बातमी पण वाचा : मुंबईतून जाता जाता कंगना राणौतचा शिवसेनेला टोला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER