लोक वाट पाहात आहेत… कधी हे सरकार जाते; चंद्रकांत पाटलांचा ठाकरेंना टोमणा

Chandrakant Patil-Uddhav Thackeray.jpg

नागपूर :- तुम्ही राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल यांच्याबद्दल काहीही बोलाल; तुम्हाला कोणी काही म्हणायचे नाही. एकदाचे घोषित करून टाका ना, की महाराष्ट्रात आणीबाणी आहे. आता लोक वाट पाहात आहेत की, कधी निवडणूक होते आणि हे सरकार जाते, असा टोमणा माजी मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांना मारला.

बहुजन कल्याण खात्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गेल्या काही दिवसांपासून केलेल्या वक्तव्यांचाही चंद्रकांत पाटील यांनी समाचार घेतला. ‘महाविकास आघाडीच मराठा आणि ओबीसीमध्ये वाद लावत आहे. विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) कोण आहेत? हे महाविकास आघाडीचे मंत्री आहेत. रोज येऊन एक एक वक्तव्य करतात. मुद्दाम जातीयवाद पसरवण्याचे काम हे लोक करतात, असा आरोपही पाटील यांनी केला.

पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे  :
शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका अचानक जाहीर झाल्या.
– तयारी झाली नाही, सतरा दिवसांत तयारी कशी करणार, यासंदर्भात विचारणा केली आहे.
– राज्यातील संघटन मजबूत करण्यासंदर्भात जिल्ह्याजिल्ह्यांत बैठका घेणे सुरू आहे.
– कांदळवन उद्ध्वस्त करत आहेत, केंद्राच्या जागेवर अतिक्रमण करण्याचा प्रश्न नाही.
– ओबीसी आणि मराठा यांच्यात वाद निर्माण करण्याचे काम राज्य सरकार करत आहे.
– आम्ही ओबीसी आणि मराठा समाजाचे आरक्षण स्वतंत्र ठेवले, न्यायालयात टिकवले.
– फूट पडून राज्य करण्याचे काम महाविकास आघाडीतील पक्ष करत आहेत.
– अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे फक्त काही लोकांसाठीच आहे का, अशा प्रकारचे प्रश्न निर्माण होत आहे.
– समीर ठक्कर प्रकरणी राज्य सरकार दंडुकेशाही करत आहे.

समीर ठक्कर याने आदित्य ठाकरेंवर टीका केल्याबद्दल त्याला पोलिसांनी अटक केली होती.

ही बातमी पण वाचा : मेट्रो कारशेड संघर्ष : ‘आई जेऊ घालिना आणि बाप भीक मागू देईना’ ; शिवसेनेचा भाजपवर हल्ला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER