जनता महँगाई से त्रस्त, मोदी सरकार टैक्स वसूली में मस्त, राहुल गांधींची टीका

Rahul Gandhi & PM Modi

दिल्ली : काँग्रेसचे (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी वाढत्या महागाईवर ट्विट करून केंद्रातील मोदी (PM Narendra Modi) सरकारवर टीका केली आहे. राहुल यांनी ट्विट केले – ‘एकीकडे महागाई गगनाला जाऊन भिडली आहे. तर दुसरीकडे जीडीपी (गॅस, डिझेल, पेट्रोल) चे दर वाढताना दिसत आहे. महागाईमुळे जनतेला जीवन नकोसे झाले आहे. मात्र, दुसरीकडे मोदी सरकार गॅस, डिझेल आणि पेट्रोलच्या किंमतीत दिवसागणिक वाढ करत आहे. यामुळे मोदी सरकार महागाई वाढवत दुसरीकडे कर गोळा करत असल्याचे दिसून येत आहे’.

या संदर्भात उल्लेखनीय आहे की, केंद्र आणि राज्य सरकारकडून आकारण्यात येणाऱ्या करांमुळे पेट्रोल-डिझेलचे दर आवाक्याबाहेर गेले आहेत. सरकार पेट्रोल आणि डिझेलवर त्याच्या मुळ किमतीच्या दुप्पटीपेक्षा जास्त कर आकारत आहेत. दिल्लीत आज पेट्रोल ८५.७० रुपये तर डिझेल ७५.८८ रुपये लीटर झाले आहे. तर मुंबईत पेट्रोल ९२.२८ रुपये तर डिझेल ८२.६६ रुपये लीटर झाले आहे.

महाराष्ट्रात सर्वात जास्त

महाराष्ट्र राज्याने पेट्रोल-झिझेलच्या दरात उच्चांक गाठला आहे. राज्यातील परभणीत सर्वात महाग म्हणजे ९४.६५ रुपये प्रतीलीटर पेट्रोल असा भाव आहे. नंदूरबार जिल्ह्यात पेट्रोलचा दर ९२.८७ रुपये प्रतिलीटर आहे. नंदूरबार सारख्या आदिवासी जिल्ह्यात पेट्रोलचे दर ९२ रुपयांच्या पुढे गेले आहेत. हे दर सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER