पंढरपुरातील कोरोना उद्रेकाला लोकच जबाबदार, मी केवळ प्रचार केला – अजित पवार

Ajit Pawar

पुणे : राज्यात कोरोना (Corona) रुग्णांच्या संख्येत दररोज वाढ होताना दिसत आहे. यातच पंढरपूर (Pandharpur) येथे झालेल्या पोटनिवडणुकीसाठी सगळेच राजकीय नेते मंडळी उमेदवारांच्या प्रचाराला गेले होते. सत्ताधारी असो वा विरोधक दोन्ही पक्षांनी गावागावांमध्ये जाऊन हजारोंच्या संख्येने गर्दी करून प्रचार सभा आयोजित केल्या होत्या. मेळावे घेतले होते. त्यामुळे आता निवडणुकीनंतर पंढरपुरातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे.

यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या विधानामुळे नवा वाद रंगण्याची चिन्हे आहे. पंढरपुरातील कोरोना रुग्णवाढीला नागरिकच जबाबदार आहेत, असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी करून सगळं खापर लोकांवर फोडत जबाबदारी झटकली आहे. पुण्यात अजित पवार पत्रकारांना म्हणाले की, आम्ही निवडणूक आयोगाने पंढरपुरात निवडणूक लावली म्हणून उमेदवारांच्या प्रचाराला गेलो. राज्य सरकारच्या हातात ज्या निवडणुका होत्या त्या आम्ही पुढे ढकलल्या. पण पश्चिम बंगाल, केरळ, आसाम, तामिळनाडू इथंही निवडणूक लावली. त्यामुळे तिकडे जाऊन सगळे जण प्रचार करतच होते. कुंभमेळ्यात लाखो लोकांनी गर्दी केली होती. लाखो लोकांनी स्नान केले होते. याला जबाबदार नागरिक आहेत.

निवडणूक आयोगाने निवडणूक लावली त्यांना जबाबदार कसं धरणार? जी काही नियमावली ठरवली आहे त्या नियमावलीचं तंतोतंत पालन करून सभा आयोजित करावी, असं आम्ही सांगितलं; परंतु काही जण मास्क लावत नव्हते, रुमाल लावायचे. त्यांना आम्ही काय बोलणार? असं सांगत त्यांनी हात झटकले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button