भाजपवर जनता जास्तच खुश : राज्याच्या आगामी निवडणुकीत १७५ ठिकाणी विजयाची शास्वती

नागपूर: २०१९ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपतर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणात राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भाजप जवळपास १७५ ठिकाणी विजयी होईल असा दावा उर्जा व उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. भाजपाच्या नाागपूर शहर कार्यकारिणीच्या बैठकीदरम्यान त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना हि माहिती दिली.

केंद्र व राज्य सरकार लोकहिताचे आणि विकासाभिमुख काम करीत आहे. राज्यातील जनता सरकारवर जास्तच खुश आहे. भाजपातर्फे नुकताच करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात राज्यात भाजपाला जवळपास १७५ ठिकाणी विजय प्राप्त होण्याची शास्वती आहे, असा दावाकरत देवेंद्र फडणवीस हे परत एकदा मुख्यमंत्री होतील, असा विश्वासही चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केला.

या वेळी बावनकुळे यांनी पक्षातर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणाची माहिती देताच उपस्थित कार्यकर्त्यानी गडकरी- फडणवीसांचा जयघोष केला. याप्रसंगी बावनकुळे म्हणाले की, राज्यातच नव्हे तर केंद्रातही पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सत्ता स्थापन करतील. नागपुरात नितीन गडकरी यांचा पराभव करणे अशक्य आहे, असेही ते म्हणाले. भाजपा केंद्रात ३९९ जागा जिंकणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक अशी ३५ हजार कोटींची कर्जमाफीची योजना सुरु केली आहे. त्यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विरोधक मात्र या योजनेबाबत शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी सरकारद्वारे घेतलेले निर्णय शेतकऱ्यांना आणि जनतेला कळावे यासाठी सर्वच कार्यकर्त्यांनी समोर यावे असे आवाहणही त्यांनी यावेळी केले.

डीजे वाजवू नका, महामार्गापासून दारुची दुकाने ५०० मीटररपेक्षा जास्त अंतरावर हवीत, असे काही निर्णय न्यायालयाने घेतले आहेत. नंतर न्यायालयानच त्यातून मार्ग काढले. मात्र, या निर्णयांमुळे जनतेत सरकार विषयी द्वेष निर्माण होतो. अशा वेळी पदाधिकारी व कार्यककर्त्यांनी पुढाकार घेऊन यात सरकारची काहीही चुकी नाही हे जनतेला समजावून द्यावे, असे आवाहन बावनकुळे यांनी केले.

कार्यकारिणीच्याा पहिल्या सत्रात आ. सुधाकर देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंंदनाचा प्रस्ताव मांडला. मुख्यमंत्र्यांंनी शेतक-यांसाठी जाहीर केलेली कर्जमाफी, घेतलेले लोकोपयोगी निर्णय, राज्यात आणलेली गुंतवणूक आदी बाबींसाठी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करण्यात आले. मांडण्यात आलेला हा प्रस्ताव एकमतााने पारीत करण्यात आला. बैठकीच्या समारोपीय सत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा अभिनंदन प्रस्ताव मांडला जाणार आहे.