शाळांमधील शिपाई पदे संपुष्टात येणार; राज्य सरकारकडून आदेश जारी

मुंबई : राज्यातील सर्व खासगी अनुदानित, अंशतः अनुदानित, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना यापुढे सुधारित आकृतिबंध लागू करण्याऐवजी विद्यार्थी संख्येनुसार प्रतिशाळा शिपाई (Peon posts) भत्ता लागू करण्यात येणार आहे. दरम्यान, या शाळांतील नाईक, पहारेकरी, रात्रीचा पहारेकरी, सफाई कामगार, हमाल, परिचर, चौकीदार, प्रयोगशाळा परिचर या पदांवरील कर्मचारी निवृत्त झाल्यावर ही पदे रद्द करण्यात येतील, असे आदेश शिक्षण विभागाकडून जारी करण्यात आले आहे.

प्रत्येक शाळेत किती विद्यार्थी संख्या असल्यास, किती शिपाई (आकृतिबंधप्रमाणे अपेक्षित चतुर्थ श्रेणी पदे) लागू राहतील, त्यांची संख्या, त्यांना मुंबई, पुणे यांसारख्या शहरांत, ग्रामीण भागात किती भत्ता दिला जाईल, याचेही निर्देश देण्यात आले आहेत. ज्या शाळांमध्ये सद्य:स्थितीत एकही चतुर्थ श्रेणी पद कार्यरत नाही, तिथे हा आकृतिबंध लागू असणार आहे, तर जिथे कर्मचारी कार्यरत आहेत, तिथे रिक्त असलेल्या पदांच्या प्रमाणात शिपाई भत्ता लागू करण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER