कोरोनामुळे अनाथ झालेल्यांना पेन्शन; मुख्यमंत्री केजरीवाल यांची घोषणा

Arvind Kejriwal

नवी दिल्ली :-  दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी मोठी घोषणा केली आहे. कोरोनामुळे (Corona) ज्या मुलांचे आईवडील दोघांचेही निधन झाले आहे, त्यांना महिन्याला अडीच हजार रुपये पेन्शन मिळेल. ही पेन्शन मुले २५ वर्षांची होईपर्यंत देण्यात येईल. सोबतच त्यांना  मोफत शिक्षणही देण्यात येणार असल्याचे केजरीवाल यांनी  जाहीर केले आहे.

“दिल्लीत ७२ लाख लोकांकडे रेशन कार्ड आहे. सरकार अशा लोकांनाही महिन्याला १० किलो रेशन देणार आहे. मात्र, दिल्लीत असे अनेक लोक आहेत ज्यांना गरज आहे पण रेशन कार्ड नाही. त्यांनाही रेशन दिले जाणार आहे. दोन ते चार दिवसांत ही व्यवस्था सुरू होईल. त्याचबरोबर ज्यांच्या घरामध्ये कमावणारा एकच व्यक्ती असेल आणि त्याचा कोरोनाने मृत्यू झाला, अशांनाही पेन्शन देण्यात येईल. दिल्लीत ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही, ज्यांना धान्याची गरज आहे त्यांना रेशन मिळेल. प्रत्येक गरजूला महिन्याला १० किलो रेशन मिळेल.” अशी घोषणा अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.

कोरोनामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे बऱ्याच लोकांचे नुकसान झाले आहे. त्यांचे नुकसान आपण कधीच भरून काढू शकत नाही, मात्र त्यांना मदत करू शकतो. अशा लोकांसाठी ५० लाख रुपयांची मदत केली जाईल, ज्यांच्या कुटुंबातील कमावणाऱ्या प्रमुख व्यक्तीचा मृत्यू झालेल्यांना ५० लाख रुपयांसह अडीच हजार रुपयांची पेन्शन दिली जाईल. त्याचबरोबर पतीचा मृत्यू झाल्यास पत्नीला आणि पत्नीचा मृत्यू झाला तर पतीला, ज्यांचे लग्न झालेले नाही, त्यांच्या आई-वडिलांनाही पेन्शन देण्यात येणार आहे, असे केजरीवाल म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button