
नवी दिल्ली : पोस्ट कार्यालय बचत बँकेत किमान बॅलन्स ५०० रुपये ठेवणे आवश्यक असल्याचे पोस्ट खात्याकडून सांगण्यात आले आहे. हा नवा नियम उद्या शुक्रवारपासून लागू होत आहे. खात्यात किमान ५०० रुपये रक्कम न ठेवल्यास १०० रुपयांचा दंड भरावा लागू शकतो.
पोस्ट कार्यालय बचत बँकेत कोणत्याही प्रकारचे खाते असले तरी त्यासाठी किमान ठेव ५०० रुपये असणे गरजेचे आहे. किमान ठेव तितकी नसल्यास दंडापोटी १०० रुपये कापण्यात येतील. दंड कापत कापत बॅलन्स शून्यावर आले तर सदर खाते बंद केले जाईल. बँकेपेक्षा चांगले व्याजदर दिले जात असल्याने पोस्ट कार्यालय बचत बँकेच्या विविध योजना आकर्षक आहेत. विशेषतः ग्रामीण भागातील लोक या योजनांचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेतात.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला