लॉकडाऊनचे नियम मोडल्यास केवळ ४० मिनिटे रामनाम लिहिण्याची शिक्षा

Penalty for writing Ramanam If your Broke Rule - Maharashtra Today

भोपाळ :- गेल्या महिन्याभरापासून भारतात कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. देशभरात रूग्ण आणि मृत्यूंची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहेत. या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आले आहे. मात्र, तरीही नागरिकांकडून लॉकडाऊनच्या नियमांचे पालन होताना दिसत नाही. मात्र मध्य प्रदेश पोलिसांनी नियम मोडणाऱ्यांसाठी वेगळीच शक्कल लढवली आहे. नियम मोडणाऱ्यांना सुमारे ४० मिनिटे रामनाम लिहिण्याची अजब शिक्षा करण्यात येत आहे.

मध्य प्रदेशच्या सतना जिल्ह्यात लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्या नागरिकांना वठणीवर आणण्यासाठी एका पोलीस उपनिरीक्षकाने नवीन शक्कल लढवली आहे. सतना जिल्ह्यातील कोलगवा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संतोष सिंह यांनी अनोखी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. लॉकडाउनचे नियम मोडणाऱ्या नागरिकांकडून पोलीस कागदावर प्रभू श्रीरामांचे नाव लिहून घेत आहेत. पोलिसांनी गेल्या काही दिवसांमध्ये नियम मोडणाऱ्या नागरिकांना पकडून ३० ते ४० मिनिटे त्याच्यांकडून रामाचे नाव लिहून घेण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. कर्फ्यूची कडक अंमलबजावणी करण्यासाठी २० चेक पॉईंट्स तयार करण्यात आले आहेत. ही शिक्षा देण्यासाठी जवळच्या नागरिकांनी त्यांना काही वह्यासुद्धा उपलब्ध करुन दिल्या आहे.

यापूर्वी आम्ही नियम मोडल्याची शिक्षा म्हणून उठा बश्या काढायला सांगत किंवा तासभर बसून नंतर सोडून देत असत. मला वाटले की ते नुसते बसण्यापेक्षा त्याऐवजी भगवान रामाचे नाव लिहू शकतात. त्यामुळे आम्ही ही शिक्षा सुरू केली. आतापर्यंत कोणावरही या शिक्षेची जबरदस्ती केली नाही. हा उपाय कोणाच्याही धार्मिक श्रद्धेच्या विरोधात नाही. लोक त्यांच्या इच्छेने लिहितात. आतापर्यंत जवळपास २५ लोकांना ही शिक्षा देण्यात आली आहे. तसेच याबद्दल आम्हाला कोणही तक्रार केलेली नाही, अशी प्रतिक्रिया उपनिरीक्षक संतोष सिंह यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button