मेस्सीचे केले पेलेंनी अभिनंदन

Pelé - Lionel Messi

एकाच क्बसाठी सर्वाधिक गोल करण्याच्या आपल्या विक्रमाची बरोबरी करणाऱ्या लियोनेल मेस्सीचे (Lionel Messi) महान फूटबॉलपटू पेले (Pele) यांनी कौतुक केले आहे. पेले यांनी म्हटलेय की या विक्रमासाठी तुझे अभिनंदन! मी तुझा मोठा प्रशंसक आहे.

मेस्सीने शनिवारी व्हॕलेन्शियाविरुध्द गोल केला.एफ.सी. बार्सिलोनासाठी (FC Barcelona) त्याचा हा 643 वा गोल होता. पेले यांनीसुध्दा सांतोस (Santos) क्लबसाठी एवढेच गोल केलेले होते. मेस्सी हा आपल्या कारकिर्दीत फक्त बार्सिलोनासाठीच खेळला आहे. 2004 पासून या क्लबसाठी खेळताना त्याने असंख्य विक्रम केले आहेत. त्यात 10 ला लिगा विजेतेपदं, चार चॕम्पियन्स लीगसह 34 वेगवेगळ्या विजेतेपदांचा समावेश आहे.

पेले यांनी 18 वर्षांच्या कारकिर्दीत हे गोल केले होते.केवळ 656 सामन्यांतच त्यांचे हे 643 गोल होते म्हणजे प्रत्येक सामन्यात त्यांनी जवळपास गोल केले आहेत.

आता मेस्सीने आपल्या विक्रमाची बरोबरी केल्यावर पेले यांनी त्याचे व्टिट द्वारे अभिनंदन करताना म्हटलेय की, जेंव्हा तुमचे हृदय प्रेमाने भरुन येते तेंव्हा वेगळ्या दिशेने जाणे कठीण असते. तुझ्याप्रमाणेच एक शर्ट दररोज घालून खेळण्यात काय आनंद असतो ते मला माहीत आहे. आपल्याला अगदी घरच्यासारखे वाटावे अशी कोणती गोष्ट असेल तर तसे समाधान दुसऱ्या कशात नाही. या विक्रमासाठी तुझे अभिनंदन, लियोनेल! पण त्यापेक्षाही बार्सिलोनासोबतच्या कारकिर्दीसाठी तुझे अभिनंदन. एकाच क्लबसाठी एवढा दीर्घकाळ प्रेम कायम ठेवायच्या गोष्टी आता कमी होत चालल्या आहेत. पण मी तुझा फार मोठा प्रशंसक आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER