द्रुतगती महामार्गावर अपघातात ठार झालेल्याला अनेक वाहनांनी चिरडले

पुणे :- पु पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर १९ फेब्रुवारीच्या रात्री बौर गावातील अशोक मगर (५२) यांचा वाहनाच्या धक्क्यामुळे मृत्यू झाला. त्यानंतर महामार्गावरून जाणाऱ्या अनेक वाहनांनी त्यांचे प्रेत चिरडले.

अशोक रस्ता ओलांडत असताना त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिली आणि ते रस्त्यावर कोसळले. त्यानंतर महामार्गावरून सुसाट धावणाऱ्या अनेक वाहनांनी त्यांना चिरडले. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचले.

पोलिसांनी सांगितले की, या रस्त्यावरून वेगाने वाहनांची वाहतूक सुरू असते. हा रस्ता पादचाऱ्यांसाठी नाही.

तामिळनाडूत बस आणि ट्रकचा भीषण अपघात, १९ जणांचा मृत्यू