पीअरसन इंडियाची नवी शैक्षणिक उडी

- ‘सीबीएसई एक्सपर्ट २०२० मालिका’ सादर

मुंबई : परीक्षांची तयारी अधिक परिणामकारकपणे करता यावी यासाठीच्या प्रयत्नांचा भाग म्हणून पीअरसन या जगातील आघाडीच्या डिजिटल लर्निंग कंपनीने विज्ञान आणि गणित या विषयांसाठीची सीबीएसई एक्सपर्ट २०२० सीरिज क्वेश्चन बँक सादर केली. चटकन उजळणी करण्यासाठी ही क्वेश्चन बँक अत्यंत प्रभावशाली आहे. सीबीएसई बोर्डाने दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा पद्धतीत नुकत्याच केलेल्या बदलांनुसार या प्रश्नांमध्ये बदल करण्यात आल्याने नव्या स्वरुपाच्या परीक्षांची तयारी करण्यात विद्यार्थ्यांना साह्य लाभणार आहे.

सीबीएसईने विद्यार्थ्यांमध्ये सृजनशील, सखोल आणि विश्लेषणात्मक विचारसरणी बिंबवण्याच्या दृष्टीने २०२३ पासून दहावी आणि बारावीच्या प्रश्नपत्रिकांमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. २०२० च्या दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांमध्ये २० टक्के वस्तूनिष्ठ प्रश्न आणि १० टक्के सर्जनशील विचारांवर आधारित प्रश्न असतील. एनसीईआरटी अभ्यासक्रमाशी संलग्न असलेल्या विज्ञान आणि गणितातील पीअरसन सीबीएसई एक्सपर्ट सीरिज क्वेश्चन बँक्स विद्यार्थ्यांना सीबीएसई पद्धतीच्या प्रश्नांची चटकन उजळणी, मागील वर्षांचे प्रश्न आणि एनसीईआरटी उदाहरणांसह साह्य करेल आणि स्वाध्यायासाठी उत्तम पर्याय उपलब्ध करून देईल.

या क्वेश्चन बँक्समध्ये सर्वसमावेशक अभ्यासासाठी २०१९-२० च्या प्रश्नपत्रिकांनुसार १ हजारहून अधिक सराव प्रश्न (वस्तूनिष्ठ आणि दिर्घोत्तरी अशा दोन्ही स्वरुपाचे) असतील. यातील संपूर्ण स्वरुपातील नमुना चाचणीमुळे विद्यार्थ्यांना आपली परीक्षेची तयारी कितपत झाली आहे, हे तपासता येईल आणि त्यानुसार आवश्यक मुद्द्यांवर अधिक मेहनत घेता येईल.

शैक्षणिक पद्धत आणि प्रणालीमध्ये सानुकूलता आणून भविष्याचा वेध घेण्यास ती सक्षम करणे आवश्यक आहे. शिक्षणाला एक नवे स्वरुप देत ते अधिक परिणामकारक आणि उत्पादक करणे आणि त्यातून एक नवी भविष्यासाठी सज्ज पिढी घडविणे, हा यामागील उद्देश आहे.

सीबीएसईने सप्टेंबर २०१९ मध्ये प्रसिद्ध केलेल्या नमुना प्रश्नपत्रिका आणि गुणांकन पद्धतींवर पीअरसन सीबीएसई एक्सपर्ट सीरिज २०२० वर आधारित असल्याने विद्यार्थ्यांची उजळणी वेगाने होईल. अभ्यासक्रमातील पाठांनुसार सारांश आणि सराव प्रश्न पुरवून परिणामकारक उजळणीत साह्य करणे हा या सीरिजचा मूळ उद्देश आहे. सुयोग्य सरावासाठी मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका आणि एनसीईआरटी नमुन्यांचा उत्तरांसह यात प्रभावी समावेश करण्यात आला आहे.

मुबलक प्रमाणातील एमसीक्यू, ठोस कारणमीमांसा, चित्रांवर आधारित प्रश्न, माहितीवर आधारित प्रश्न आणि थोडक्यात उत्तरांचे प्रश्न यात असल्याने विद्यार्थ्यांना २०१९-२० सीबीएसई प्रश्नपत्रिकेचा योग्य सराव होईल. विद्यार्थ्यांना गुणांचाही साधारण अंदाज बांधता यावा यासाठी प्रत्येक पायरीचे गुणही यात नमूद करण्यात आले आहेत. प्रत्येक पाठाच्या शेवटी दिलेल्या मास्टर टेस्टमुळे विद्यार्थ्यांना प्रत्येक पाठाची किती तयारी झाली आहे, हे लक्षात येईल. संपूर्ण नमूना प्रश्नपत्रिकाही पुस्तकाच्या शेवटी दिलेली आहे. त्यामुळे, प्रत्यक्ष परीक्षा दिल्याचाही अनुभव आणि सराव विद्यार्थ्यांना मिळतो.