काश्मीरमध्ये शांतता; युरोपियन मंडळाची ग्वाही

नवी दिल्ली : काश्मीरमध्ये स्थिती सामान्य आहे, अशी ग्वाही युरोपियन मंडळाच्या २८ खासदारांच्या प्रतिनिधी मंडळाने पत्रपरिषदेत दिली. या प्रतिनिधी मंडळाने दोन दिवस काश्मीरचा दौरा केल्यानंतर तेथील स्थितीबाबत उल्लेखित मत व्यक्त केले. थेरी यदियानी म्हणाले की, जगात दहशतवाद हा बिकट प्रश्न झाला आहे. काश्मीरमध्ये दहशतवाद हा काळजी करण्याचा विषय आहे. पाकिस्तानने त्यांच्या देशातील दहशतवाद्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे.

आम्ही काश्मीरमधील नागरिकांशी तिथल्या परिस्थितीबाबत चर्चा केल्यानंतर आमचे निरीक्षण मांडतो आहे. थेरी यदियानी हे याआधी २० वेळा भारतात येऊन गेले आहेत. २९ ऑक्टोबरला दहशतवाद्यांनी काश्मीरमध्ये एका मजुराची हत्या केली. यावर प्रतिमंडळाने दुःख व्यक्त केले. बिल न्यूटन म्हणाले – काश्मीरमधील नागरिकांनी चर्चेदरम्यान तक्रार केली की, केंद्राकडून विकासासाठी मिळणाऱ्या निधीत मोठा भ्रष्टाचार होत होता. एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी यांनी या प्रतिमंडळावर, ते नाझीवादी असल्याचा आरोप केला होता. या आरोपावर संताप व्यक्त करताना हे खासदार म्हणाले की, आम्ही नाझीवादी असतो तर जनतेने आम्हाला निवडून दिले नसते.