PCOD – स्त्रियांना हैराण करणारा आजार !

PCOD

मासिक पाळी अनियमित किंवा दर महिन्याला न येणे किंवा कधी १५ – १५ दिवस रक्तस्राव होणे. काही स्त्रियांमधे अगदी कमी प्रमाणात पाळी जाणे व १-२ दिवसच स्त्राव होणे अशी लक्षणे दिसून येतात. मुलींमधे अचानक वजन वाढणे, हनुवटी गालावर ओठांवर लोम जास्त प्रमाणात वाढ तसेच राठ लोम दिसणे ही लक्षणे दिसायला लागतात. कुणाला खूप उष्णता जाणवते. ही सर्वच लक्षणे कमी अधिक प्रमाणात दिसायला लागली आहेत. poly cystic ovary असल्यास हा त्रास दिसून येतो. स्त्री शरीरात असणाऱ्या ओव्हरीजमधे एकापेक्षा जास्त ग्रंथी बनण्याची प्रवृत्ती या लक्षणांना निर्माण करणारी असते. या आजाराची त्वरीत चिकित्सा गरजेची ठरते कारण वंध्यत्व, गाठी होणे अशा मोठ्या आजार परावर्तन होऊ शकते.

चिकित्सा करतांना हा आजार कशामुळे उद्भवला याची कारणे शोधणे खूप महत्त्वाचे आहे. जोपर्यंत निदान परिवर्जन ( कारणांचा त्याग) होत नाही तोपर्यंत पूर्ण उपशय मिळणे कठीण आहे. कारणांचा नाश केल्याशिवाय व्याधीचा समूळ नाश होऊ शकत नाही.

प्रत्येक रुग्णामधे कारणे वेगवेगळी असू शकतात. त्याचा खोलवर विचार करणे आवश्यक आहे.

मिथ्या आहार विहार, व्यायाम न करणे, प्रांतीय आहार न घेता सतत परप्रांतीय आहार ( चायनीज चीज मेयोनिज) घेणे. भूक नसतांना जेवणे. वारंवार खाणे, मिल्क शेक सारखे विरुद्धाहार घेणे व चिंता टेंशन अस्वस्थतासारखी मानसिक कारणेदेखील यात दिसून येतात. पाळीच्या दिवसात काळजी न घेणे अशी कारणे सुद्धा दिसून येतात.

PCOD करता अनेक हार्मोनल चिकित्सा दिली जाते. पण आयुर्वेद मात्र अगदी आहार विहारापासून या आजाराचा विचार करण्यास सांगतो. आहार व्यायामाची जोड आयुर्वेद चिकित्सेला सफल करते. औषधी वमन विरेचन बस्तिसारखे पंचकर्म नक्कीच या आजाराला दूर करणारे आहे. वैद्याच्या सल्ल्याने नक्कीच या pcod च्या त्रासापासून मुक्तता मिळू शकते.

ayurveda

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER