
आयसीसी टी -२० वर्ल्ड कप २०२१ चा आयोजन यावर्षी भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड बऱ्याच काळापासून व्हिसा संदर्भात भारताकडून आश्वासन मागतो आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB chairman ) अध्यक्ष एहसान मणी ( Ehsan Mani) म्हणाला की, जोपर्यंत भारत आगामी संघ टी -२० विश्वचषक स्पर्धेसाठी (T20 World Cup ) आपल्या संघ, चाहते आणि पत्रकारांना व्हिसा देण्याचे लेखी आश्वासन देत नाही, ही स्पर्धा युएईमध्ये व्हावी अशी त्यांची मागणी कायम राहील.
लाहोरमधील PCB च्या मुख्यालयात मीडियाशी बोलताना एहसान मणी म्हणाले की, बोर्डने ICC ला आपले मत सांगितले आहे. ते म्हणाले, ‘बिग थ्री ची मानसिकता बदलण्याची गरज आहे. आम्ही केवळ राष्ट्रीय संघासाठीच नाही तर आमच्या चाहत्यांसाठी, अधिकारी व पत्रकारांनाही व्हिसा मिळण्याची लेखी हमी विचारत आहोत.’
मनी म्हणाले, ‘आम्ही ICC ला सांगितले आहे की आम्हाला मार्च अखेर लेखी आश्वासन आवश्यक आहे जेणेकरुन पुढे काय करावे हे आम्हाला ठाऊक राहील नाहीतर भारताऐवजी युएईमध्ये विश्वचषक होण्याच्या मागणीला आपण धरून राहू.’ ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये टी -२० विश्वचषक भारतात होणार आहे. मनी म्हणाले की, त्यांना पाकिस्तानच्या संपूर्ण संघाच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत BCCI कडून लेखी आश्वासन देखील हवे आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला