पायल घोष बनणार ‘मधुबाला’

Payal Ghosh - Madhubala

भारतीय चित्रपटसृष्टीतील सौंदर्यवती म्हणजे मधुबाला. तिच्या सौंदर्याचे वर्णन करावे तेवढे थोडेच आहे. आजही तिच्या सौंदर्याचे गोडवे गायले जातात. परंतु तिचे हे सौंदर्य शापित होते असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. उण्यापुऱ्या 40 वर्षांच्या कारकिर्दीत मधुबालाने खूप काही भोगले. तिची जीवनगाथा पडद्यावर आणण्याचे यापूर्वी काही प्रयत्न झाले होते परंतु ते यशस्वी झाले नाहीत. मात्र आता पुन्हा एकदा मधुबालाच्या जीवनावर ‘रेड’ नावाने एक चित्रपट तयार केला जाणार असून त्यात पायल घोष (Payal Ghosh) मधुबालाची भूमिका करणार आहे. या चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शक अशोक त्यागी करीत असून निर्माते आहेत राजीव चौधरी.

काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक अनुराग कश्यपवर (Anurag Kashyap) लैंगिक शोषणाचा आरोप करीत पायल घोष चर्चेत आली होती. तिने पोलिसांमध्ये तक्रारही दाखल केली होती. पायलने तिच्या करिअरची सुरुवात इंग्रजी टेलीफिल्म ‘शार्पस पेरिल’मधून केली होती. तेव्हा ती फक्त 17 वर्षांची होती. त्यानंतर तिने तेलुगु चित्रपट ‘प्रयाणम’मध्ये काम केले. बॉलिवूडमध्ये तिचा प्रवेश 2017 मध्ये ऋषी कपूर आणि परेश रावल अभिनीत ‘पटेल की पंजाबी शादी’मधून झाला होता.

मधुबालाच्या (Madhubala) भूमिकेबद्दल माहिती देताना पायलने सांगितले, पडद्यावर मधुबालाची भूमिका साकरण्यासाठी मी खूपच उत्सुक आहे. आजच्या पिढीला मधुबालाबाबत माहिती नाही. त्यांना तिची माहिती व्हावी हा या चित्रपटाचा उद्देश्य आहे. मधुबालाची भूमिका साकारण्याचे दडपण माझ्यावर आहेच. चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच यात मी किती यशस्वी झाले आहे ते समजेल. असेही पायल म्हणाली. पायलसोबत या चित्रपटात कृष्णा अभिषेकही काम करणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER