हवे तर पैसे देतो, पण लस उपलब्ध करून द्या : नवाब मलिक

Coronavirus vaccine - Nawab Malik

मुंबई :- देशातील दोन कंपन्यांचा अपवाद वगळता जगातील बहुतांश कंपन्यांनी थेट राज्यांना लसीकरण करण्यास नकार दिला आहे. केंद्राने आता तरी एक राष्ट्रीय पॉलिसी तयार करून ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी व्यक्त केले.

“मात्र, देशाची एक पॉलिसी ठरवावी आणि लस पुरवठा करा, अशी मागणी आधीपासूनच करत होतो. जर केंद्राने ३५ हजार कोटींचे बजेट ठरवले तर त्या पैशात देशातील लोकांना मोफत लस देता येईल. केंद्राने १८ ते ४५ वर्षांवरील लोकांची जबाबदारी राज्यांवर ढकलली आहे. केंद्राला पैसे अपेक्षित असतील तर त्यांनी पैसे जमा करा, आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देतो असे सांगावे.” असा टोला मलिकांनी लगावला.

याबाबत एक पॉलिसी ठरवून सगळी जबाबदारी घेऊन पैसे द्या, आम्ही उपलब्ध करून देतो असे सांगावे. जर ही पॉलिसी ठरविण्यात आली नाही तर याचे पुरवठादार आहेत ते ज्या राज्यांना जास्त पैसे देऊन त्यांनाच लस देतील. यात काही राज्ये वंचित राहतील. कोरोनावरील लागणारी सर्व औषधे, रेमडेसिवीर, म्युकरमायकोसिसची औषधे, इतर सर्व औषधे राज्य सरकार पैसे देऊनच घेत आहे. केंद्र मोफत देत नाही, असे नवाब मलिकांनी स्पष्ट केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button