शुक्रवारची जुम्मा नमाज घरीच अदा करा – मौलाना डॉ अब्दुल रशीद मदनी

उलेमांच्या बैठकीत घेण्यात आला निर्णय

औरंगाबाद : शुक्रवारची जुम्मा नमाज घरीच अदा करा व अल्लाकडे दुवा करा की, कोरोना सारख्या व्हायरस पासून सर्व मानव जातीचे रक्षण व्हावे. मस्जिद मध्ये नमाज केवळ इमाम व मोज्जन अदा करतील. इतरांनी मात्र आपल्या घरीच नमाज अदा करावी असे. आवाहन इमारते शरियाचे मराठवाडा उपाध्यक्ष मौलाना डॉ अब्दुल रशीद मदनी यांनी केले. हा निर्णय उलेमाच्या बैठकीत घेण्यात आला असल्याचे ते म्हणाले.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशभरात मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळत आहेत. खबरदारी म्हणून नागरिकांनी एकत्रित येऊ नये. अशा सूचना केंद्र व राज्य सरकारने दिल्या आहेत. त्या सूचनांचे पालन करत सर्व मुस्लिम बांधवांनी जुम्मा नमाज ही आपल्या घरीच अदा करावी. याविषयी देशभरातील उलेमा व इकराम यांनी हा निर्णय घेतला आहे. देशावर व जगावर कोरोनाचे महाभयंकर संकट आले आहे. त्याचा सामना करण्यासाठी सर्व नागरिकांनी शासनाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब करत मानवजातीच्या हितासाठी आपल्या घरी नमाज अदा करावी. मानव जातीच्या आरोग्यासाठी अल्ला जवळ दुवा करावी. जेणेकरून हे संकट दूर होऊन मानव जातीचे रक्षण होईल. यासाठी सर्वांनी आपल्या घरीच नमाज अदा करून अल्लाकडे दुवा करावी यासाठी शासनाला व मस्जिद कमिटीला सहकार्य करावे असे आवाहन इमारते शरियाचे मराठवाडा उपाध्यक्ष डॉ.मौलाना डॉ.अब्दुल रशीद यांनी केले आहे.