मुलाचे छंद जोपासायचे सोडून जरा महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांकडे लक्ष द्या; निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला

Nilesh Rane-CM Uddhav Thackeray.jpg

मुंबई :- अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर भाजप (BJP) नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे.

परतीच्या पावसामुळे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मुलाचे छंद जोपासायचे सोडून महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांवर लक्ष द्या, असे ट्विट करून निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली आहे.

दरम्यान याअगोदर मुख्यमंत्रीजी घर सोडा आणि बाहेर पडा. आम्ही तुमच्यावर थेट टीका करण्याचे टाळत आलो पण आता शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे झालेले हाल ऑनलाईन बघता येणार नाहीत. थेट बांधावर जाऊन ते अश्रू पुसा व त्यांना त्वरित आर्थिक मदत द्या, अन्यथा लोकांचा ‘ठाकरे’ नावावरील विश्वास उडेल, असे ट्विट बाळा नांदगावकर यांनी केले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER