महिना हजार रुपये भरा आणि रिटायर झाल्यावर मिळवा ढिगभर पैसे

महिना हजार रुपये भरा आणि रिटायर झाल्यावर मिळवा ढिगभर पैसे

कोरोनाकाळ (Corona) आणि लॉकडाऊनचा (Lockdown) सर्वांनाच फटका बसलाय. काहींच्या नोकऱ्या गेल्या तर काहींच्या पगारात कपात करण्यात आली. यानंतर भारतात अर्थविषयक जागृती यायला सुरुवात झाली. लोक पैसा वाचवण्यासाठी भविष्य सुरक्षित करण्यासाठी विविध मार्ग शोधताहेत. आता बऱ्याच जणांना रिटायरमेंटनंतर आपलं कसं होईल असा प्रश्न पडला असेल पण केंद्राची एक अशी योजना आहे जी तुमची चिंता कायमची मिटवू शकते.

शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणारी पेन्शन आणि रिटायरमेंटनंतर त्यांच्या वाट्याला येणारं सुखाचं आयुष्य याबद्दल खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना नेहमीच अप्रुप वाटतं. पण चिंता करण्याची गरज नाही. राष्ट्रीय पेन्शन योजना (National Pension Scheme) तुमच्या सर्व प्रश्नांवर उत्तर आहे.

जानेवारी २००४मध्ये या योजनेला सुरुवात झाली. सुरुवातीच्या काळात फक्त सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता यायचा. २००९नंतर सर्वच क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ घेण शक्य झाल्यामुळं अनेक जण या योजनेशी जोडले गेलेत. तुम्हीही जर खासगी कंपनीत काम करताय आणि सुरक्षित भविष्याच्या शोधात आहात तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे.

रिटारमेंटनंतरही पैशाचा प्रवाह सुरु रहावा ही प्रत्येकाचीच इच्छा असते. त्यासाठी तुम्ही राष्ट्रीय पेशन्श योजना (NPS)मध्ये खातं सुरु करु शकता. या योजनेनूसार वयाची ६० वर्ष पूर्ण झाल्यानंतर मोठ्या रकमेसह, मासिक पेन्शनही मिळते. त्यामुळं तुम्हाला कोणावरही अवलंबून रहावं लागणार नाही. महिन्याभराच्या कमाईतला ठरावीक हिस्सा आपण या पेन्शनमध्ये जमा करु शकतो. NPS मध्ये मासिक १ हजार रुपयांपासूनच्या गुंतवणूकीपासून आपण सुरुवात करु शकतो, जी वयाच्या ६५ वर्षांपर्यत चालवता येईल. NPS मध्ये गुंतवणूकीसाठी ४०टक्के एनयुटी खरेदी करावी लागते. त्यानंतर ६० टक्के रक्कम वयाच्या ६० वर्षानंतर मुद्दल काढता येते.

उदाहरण-
जर ३० वर्षाचे असताना तुम्ही NPS मध्ये खातं काढलं आणि दर महिन्याला ५ हजार रुपये भरायला सुरुवात केली आणि हे सातत्य पुढच्या ३० वर्षापर्यंत सुरु राहिलं तर त्या गुंतवणूकीवर १० टक्क्यांच्या परताव्यासह तुमच्या खात्यावर १.१२ करोड रुपये असतील. नियमानूसार वयाच्या ६०व्या वर्षी ४५ लाख मिळतील. सोबतच दरमहिना ४५ हजार मिळतील. गुंतवणूकदार ३० वर्षात एकूण १८ लाखांची गुंतवणूक करेल त्यातून प्रतिवर्ष दहा टक्क्यांच्या हिशोबानं परताव्याचं अनूमान लावता येईल. यात व्याजदरांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.

साठ वर्षानंतर काढता येईल पैसा

मॅच्यूरिटीनंतर गुंतवणूकदार NPSमधील ६०टक्के पैसा काढू शकतात. NPSमध्ये दोन प्रकारचे अकाउंट असतात. टियर-१ आणि टियर-२. १८ ते ६५ वर्ष वयोगटातील भारतीय नागरीक या योजनेत पैसे गुंतवू शकतो. कोणत्याही बँकेत याचे खाते सुरु करता येते.

करातून मिळेल सवलत

NPS अंतर्गत ग्राहकांना करात सवलत मिळते. इनकम टॅक्स अॅक्टच्या सेक्शन ८० सी नूसार १.५ लाख रुपये, सोबतचं ५० हजारांचा बेनिफिट टॅक्स घेता येईल. म्हणजे NPSमध्ये गुंतवणूक करुन आपण आयकरमधील २ लाख रुपये वाचवू शकतो.

कसं सुरु कराल खातं

घर बसल्या ऑनलाइन तुम्ही NPS खातं सुरु करु शकता. eNPS अकाउंड सुरु करु शकता. NPSमध्ये पेन्शन फंड नियामक विकास प्राधिकरणाद्वारे चालवलं जातं. या कारणामुळं हे खातं अत्यंत सुरक्षित राहतं.

Source : india.gov.in

Disclaimer : Please read these terms and conditions carefully from india.gov.in website.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER