पवारांची भूमिका हीच ‘ठाकरे’ सरकारची भूमिका – संजय राऊत

Sanjay Raut-Sharad Pawar-Uddhav Thackeray

मुंबई :- मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहे. अनिल देशमुख यांनी महिन्याला १०० कोटींचे टार्गेट (100 crore target) दिल्याचं पत्रात म्हटले आहे. मात्र सत्ताधाऱ्यांकडून परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी केलेले आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणाची योग्य तपास यंत्रणेच्या माध्यमातून चौकशी व्हावी अशी मागणी करणारी याचिका परमबीर सिंग यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे. आणि याच मुद्द्यावरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज माध्यमांशी बोलताना भाजपसह परमबीर सिंग यांच्यावर निशाणा साधला.

परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपाची आधी चौकशी व्हायला हवी होती. त्यांनी केलेल्या आरोपाप्रमाणे गुजरातमध्येही एका पोलीस अधिकाऱ्याने आरोप केले होते. मात्र त्यावर कुठलीही चौकशी झाली नाही. तेव्हा राजीनामे का घेतले नाही? आधी त्या आरोपाची चौकशी व्हायला हवी. परमबीर सिंह कोर्टात गेले असतील तर चांगली गोष्ट आहे. राज्यसभेत सुप्रीम कोर्टाचे निवृत्त सरन्यायाधीश रंजन गोगोई सदस्य असून त्यांचं वक्तव्य मी वाचत होतो. सुप्रीम कोर्टात कोणलाही न्याय मिळत नाही, याचा अर्थ सुप्रीम कोर्टात दबावात काम करतं असं ते म्हणाले होते. जर परमबीर सिंह यांना हाच दबाव वापरुन काही काम करायचं असेल किंवा करुन घ्यायचं असेल तर ते सुप्री कोर्टात जाऊ शकतात. रंजन गोगोई यांच्या वक्तव्यावर विश्वास ठेवल्यास ईडी, सीबीआय यांच्याप्रमाणे सुप्रीम कोर्टाचाही वापर केला जात आहे,” असं संजय राऊत म्हणाले

अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याबाबत बोलताना राऊत म्हणाले कीं, देशमुखांच्या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भूमिका मंडळी आहे. त्यांनी घेतलेली भूमिका म्हणजे ‘ठाकरे’ सरकारची भूमिका आहे. त्यांच्यावर झालेले आरोप तथ्यहीन असल्याचे पवारांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे यावर आता बोलायचे नाही, असेही राऊत म्हणाले.

ही बातमी पण वाचा : …म्हणूनच नवनीत राणा उद्धव ठाकरेंचा द्वेष करतात; अरविंद सावंतांनी आरोप फेटाळला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER