ममतांच्या आवाहनाला पवारांचा प्रतिसाद, पश्चिम बंगालमध्ये प्रचाराला जाणार?

Sharad Pawar-Mamata Banerjee

मुंबई :- भाजपचा विजय रथ रोखण्यासाठी तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देशातील सर्व विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांना समर्थन देण्याबाबत पत्र दिले आहे. ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनाही (Sharad Pawar) पत्र प्राप्त झाले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ममताजींना पाठिंबा असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

तसेच शरद पवार १ ते ३ एप्रिल असा पश्चिम बंगालचा दौरा होता. पण त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्याने त्यांना जाता येणार नाही. मात्र त्यांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा झाली तर ते शेवटच्या टप्प्यातील प्रचाराला पश्चिम बंगालला जातील, अशी माहितीही नवाब मलिक (Nawab Malik) यांनी दिली.

ही बातमी पण वाचा : ‘भाजप विरोधात उभं राहण्याची हीच ती वेळ’, ममता दीदींचे पवार, ठाकरेंना पत्र

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button