‘पवारांची पॉवर’, भाजपच्या आमदाराने राष्ट्रवादीला दिली ५ कोटींची देणगी

Mangal Prabhat Lodha - Sharad Pawar

मुंबई : निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आलेल्या पक्षाच्या देणगी अहवालानुसार, २०२०-२१ साली भारतीय जनता पक्षाचे आमदार मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांच्या मालकीच्या लोढा डेव्हलपर्सने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ५ कोटींची देणगी दिली. राजकीय पक्षांना निवडणूक आयोगाला दरवर्षी २० हजार रुपयांपेक्षा जास्त देणगी जाहीर करावी लागते.

एकंदरीत, राष्ट्रवादीला (NCP) देणगी २०२०-२०२१ साली जवळपास पाच पट वाढून 59 .94 कोटी रुपये झाली, जी मागील आर्थिक वर्षात १२.०५ कोटी होती. पाचवेळा आमदार आणि भाजपचे (BJP) मुंबई शहराचे विद्यमान अध्यक्ष लोढा यांनी भाष्य केले असता ते म्हणाले, “मी थेट व्यवसायाकडे लक्ष देत नाही. तुम्हाला कंपनीच्या एखाद्याशी संपर्क साधला पाहिजे.

याबाबत लोढा डेव्हलपर्सशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. राष्ट्रवादीचे मंत्री आणि मुंबईचे अध्यक्ष नवाब मलिक (Nawab Malik) म्हणाले, राष्ट्रवादीला अनेकांकडून देणगी मिळत आहे. त्या पारदर्शकपणे निवडणूक आयोगासमोर मांडल्या जातात. त्यामुळे कोणत्याही संशयाचे कारण नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER