पवारांचे मिशन केरळ : पक्षविरोधी काम करणा-या आमदाराची केली हकालपट्टी

Sharad Pawar

केरळ :  केरळमध्ये लवकरच विधानसभा निवडमुका येऊ घातल्या आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसने आता कर्नाटकातही आपले दंड थोपटले आहेत. गेल्यामहिन्यातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल(Praful Patel) यांनी केरळचा दौरा केला होता. केरळातील एलडीफ (LDF) सरकार आणि केरळ राष्ट्रवादीतील गटबाजीच्या पार्श्वभूमीवर डॅमेज कंट्रोल करण्याच्या पार्श्वभूमीवर हा दौरा होता.

येणा-या निवडणुकीत सत्ताधारी एलडीएफ सोबत राहायचे की युडीएफसोबत (UDF) जायचे, यावरुन वाद सुरू असतानाच राष्ट्रवादीतील आमदाराने पक्षवरोधी काम केल्याचे उघड झाल्यानंतर शरद पवार यांनी त्या आमदाराची थेट पक्षातूनच हकालपट्टी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मणी सी कप्पन यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसच्या नेतृत्वातील यूडीएफमध्ये प्रवेश केला. रविवारी त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केल्याचं सांगितलं जात आहे. यानंतर कप्पन यांच्यावर वरिष्ठांकडून कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.

नेमके प्रकरण असे आहे की –

राष्ट्रवादीचे नेते आणि केरळचे परिवहनमंत्री ए के ससिंद्रम विरुद्ध केरळ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पी पीठंबरन यांच्यातील वाद शिगेला पोहचला आहे. पीठंबरन य़ांना आमदार मणी कप्पन यांचा पाठिंबा आहे. येत्या विधानसभा निवडणुकांसाठी सत्ताधारी एलडीएफ सोबत राहायचे की युडीएफसोबत (UDF) जायचे, यावरुन हा वाद आहे. कोणताही निर्णय घेतला तरी पक्षात फूट पडण्याची शक्यता आहे. केरळमध्ये राष्ट्रवादीच्या चार जागा आहेत, मात्र त्या जागा यावेळीही राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता कमी आहे. यातल्या पाला जागेसाठी कप्पन हे आग्रही आहेत. मात्र ही जागा काँग्रेसला मिळण्याचा दावा काँग्रेसी नेत्यांनी केल्याने, कप्पन गट नाराज आहे.

ही बातमी पण वाचा : पवारसाहेब आम्हाला चिंता वाटतेय…

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER