पवारांचे मिशन झारखंड: लवकरच झारखंड सरकारमध्येही राष्ट्रवादी काँग्रेसचा मंत्री?

Sharad Pawar

रांची :- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी रविवारी झारखंडचा दौरा करुन काँग्रेसच्या चिंतेत भर टाकली आहे. देशभरात कॉंग्रेस पक्षाचा प्रभाव कमी होत आहे. त्यामुळे इतर विरोधी पक्षांकडून यूपीएच्या नेतृत्व बदलाची मागणी जोर धरू लागली आहे. आणि अशातच पवारांनी झारखंडचा दौरा करुन काँग्रेसमध्ये खळबळ उडवून दिली. या दौऱ्यात त्यांनी झारखंड मुक्ती मोर्च्याचे नेते आणि मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांची भेट घेऊन यूपीएच्या नेतृत्वबदलाबद्दल चर्चा केल्याची माहिती पुढे येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार यांनी यूपीए अधिक बळकट करण्यासाठी मुख्यमंत्री विरोधी हेमंत यांच्याशी चर्चा केली. भाजपविरोधी पक्षांना अधिक मजबूत करण्यासाठी युपीएच्या नेतृत्वबदलाची गरज त्यांनी बोलून दाखवली. दोन नेत्यांमध्ये झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर हेमंत यांनी यूपीए नेतृत्व म्हणून शरद पवार यांच्या नावाला पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राजकारणाचे चाणक्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पवारांनी हेमंत सोरेन यांच्याशी झारखंडच्या सरकारमध्ये सहभागी होण्याबाबतही चर्चा केल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे लवकरच हेमंत सोरेन सरकारमध्ये औपचारिकरित्या राष्ट्रवादीचा मंत्री राहण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. राज्यातील झामुमो सरकारला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे. हुसेनाबादचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार कमलेशकुमार सिंग हे आधीपासूनच मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याबाजूने ठामपणे उभे आहेत. आता राष्ट्रवादी कॉंग्रेसने सरकारला पाठिंबा दिल्यामूळे त्यांची मंत्री होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान, शरद पवार (Sharad Pawar) यांनी रविवारी हरमू मैदान येथे पक्षाच्या राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित केले. येथे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे. झारखंडमध्ये बरेच काही करण्याचा आमचा मानस आहे. राष्ट्रवादीचा आमदार निवडून देऊन त्याची तुम्ही सुरुवात केली आहे. जर आमचे आणखी आमदार निवडून आले तर झारखंडच्या बर्‍याच समस्यांवर तोडगा काढू. महाराष्ट्राप्रमाणे आपणही झारखंडचा विकास करू. या मेळाव्यात आलेल्या २४ जिल्ह्यांतील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उपस्थित सर्व अधिकारी व कार्यकर्त्यांचे मी अभिनंदन करतो. झारखंड हे भगवान बिरसा मुंडा यांच्या भक्तांचे राज्य आहे. या भूमीवरील लोकांकडे उंच शिखर गाठण्याची क्षमता आहे. पक्षाच्या राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळाव्यात उपस्थित राहिल्याचा मला आनंद आहे. हुसेनाबादचे आमदार कमलेश सिंग यांनी स्थानिक पातळीवर पक्ष वाढविण्यासाठी परिश्रम घेतले आहेत, असेही पवार म्हणाले.

ही बातमी पण वाचा : जागतिक महिला दिनानिमित्त शरद पवारांकडून महिलांचे कौतुक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER