पवारांचे पत्र 165 पानांचे, दोनच पाने दाखवून भाजपकडून दिशाभूल – नवाब मलिक

Sharad Pawar - Nawab Malik

मुंबई : राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे एपीएमसी संदर्भातील ते पत्र 165 पानांचे असून त्यातील दोनच पाने दाखवून भाजपकडून दिशाभूल केली जात आहे असा घणाघात राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून शेतकरी आपल्या मागण्या घेऊन केंद्र सरकारकडे ठिय्या मांडून आहेत. नवीन कृषी कायदे शेतक-यांच्या हिताचे नसून बळी घेणारे असल्याचे मत शेतक-यांनी व्यक्त केले आहे. तरी केंद्र सरकार आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने आज देशभरात संप पुकारण्यात आला आहे. शेतक-यांच्या बाजून शरद पवार यांनी भूमिका मांडल्याने बाजपने पवारांचे एक पत्र व्हायरल केले आहे. मात्र, पवारांचे पत्र 165 पानांचे असून फक्त दोन पाने दाखवून भाजपकडून दिशाभुल करण्ात येत असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

शरद पवार यांनी त्यावेळी सर्वसमावेशक आणि व्यापक अशा एपीएमसी अॅक्टसाठी राज्यांना सूट दिली होती, मात्र भाजप हा शेतकऱयांचा पक्ष नसून शेतकऱयांच्या मालाची लूट करणारा पक्ष आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते मंत्री नवाब मलिक यांनी सोमवारी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलनाला पाठिंबा देताच भाजपने शरद पवार हे कृषीमंत्री असतानाचे एक पत्र व्हायरल केले आहे. यावर बोलताना नवाब मलिक म्हणाले, शरद पवार कृषीमंत्री असताना त्यांनी कोणताही निर्णय एकटयाने घेतला नव्हता. निर्णय घेत असताना त्यांनी राज्याचे म्हणणे ऐकून घेतले तसेच केंद्राचा कायदा सरसकट न लादता राज्यांनाही त्यांच्या पद्धतीने बदल करण्याचे अधिकार दिले. मोदी सरकारने आणलेल्या नव्या कायद्यांमध्ये कृषी उत्पन्न बाजार समित्यांना निष्प्रभ केले आहे. तसेच हमीभावाबद्दल कोणतेही आश्वासन दिलेले नाही. शेतकऱयांनी आंदोलन सुरू केल्यानंतर मोदी सरकार हमीभाव कायद्यात अंतर्भूत असल्याचा शब्द देत आहे. मात्र सरकार हे शब्दांनी नाही तर कायद्याने चालते, त्यामुळे कायद्यात हमीभावाचे आश्वासन असायला पाहिजे होते, असेही नवाब मलिक यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER