पवारांची मुलाखत म्हणजे सेना – कॉंग्रेसला धीर देण्याचा प्रयत्न : चंद्रकांत पाटील

Pawar's interview is an attempt to reassure Sena-Congress Chandrakant Patil

मुंबई : शिवसेनेचे खासदार, सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची दीर्घ मुलाखत घेतली. ही मुलाखत तीन भागांत प्रसिद्ध करण्यात आली. एवढेच नाही तर मुलाखतीचे टिझर प्रसिद्ध झाल्यानंतर मुलाखतीची उत्सुकता ताणली गेली होती.

पवारांची मुलाखत प्रसिद्ध झाल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या मुलाखतीवर टीका केली आहे.
राऊतांनी घेतलेली पवरांची मुलाखत म्हणजे शिवसेना – कॉंग्रेसला धीर देण्याचा प्रयत्न असल्याची टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

कॉंग्रेस – राष्ट्रवादी एकत्र लढूनही एकूण 98 जागा निवडून आल्या आणि आमच्या एकट्याच्या 105 निवडून आल्या आहेत.” असे म्हणत पाटील यांनी पुढच्या निवडणुकीत वेगळे लढून दाखवा स्वतंत्र लढल्यावर चारही पक्षांपैकी कुणाला किती बेस आहे हे बघू,” असे आव्हान पाटील यांनी केले आहे.

ही मुलाखत म्हणजे, बुडत्याला काठीचा आधार म्हणावा असेच म्हणावे अशाच आशयाने पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

हे सरकार पाच वर्षे चालेल असे पवारांचे सांगणे म्हणजे सेना – कॉंग्रेसला धीर देण्याचे काम आहे आणि हेच मोठे सिक्रेट आहे अशी टिप्पणी पाटील यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER