पवारांच्या हस्तक्षेपामुळे परमबीर सिंग यांची बदली टळली

Sharad Pawar - CM Uddhav Thackeray - Parambir Singh

मुंबई : राजकीय पटलावर घडणा-या प्रत्येक गोष्टीमागे, अर्थ व कारण दडलेलं असतं. सामनाला मुलाखत दिल्यानंतर शरद पवार मातोश्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटायला गेलेत. पोलीस अधिका-यांच्या बदल्या आणि ठाण्यातील आयुक्तांच्या बदल्या यावरून जो संभ्रम आणि नाराजी होती यावर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

या भेटीनंतर मुंबईचे पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांची बदली टळल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परमवीर सिंग यांची बदली करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र मातोश्रीवर झालेल्या बैठकीत बदली न करण्याचा निर्णय झाला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना न विचारताच मुंबई पोलीस उपायुक्तांच्या बदल्या करण्यात आल्याने मुख्यमंत्री आयुक्त परमवीर सिंग यांच्यावर नाराज होते. या नाराजीतून परमबीर सिंग यांची बदली करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला होता. मात्र, पवारांच्या हस्तक्षेपानंतर परमबीर सिंग यांची बदली टळल्याची माहिती आहे. असे वृत्त टीव्ही 9 ने दिले आहे.

परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना न सांगता घेतलेले निर्णय –

मुख्यमंत्र्यांना न विचारताच मुंबईतील 10 पोलीस उपायुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यांना अंधारात ठेवून वाहनांसाठी 2 किमी लक्ष्मणरेषेचा आदेश दिला होता. तसेच मुख्यमंत्र्यांना माहिती न देताच परस्परच कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या पोलिसांना शहीदाचा दर्जा देण्याचा निर्णय झाला होता.

मुंबई पोलीस आयुक्तांनी तीन महत्त्वाचे निर्णय न विचारता घेतल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज होते.

दुसरीकडे, ठाणे जिल्ह्यातील चार आयुक्तांच्या बदल्यांवर राष्ट्रवादी पक्ष नाराज होता. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीला न विचारताच बदल्यांचा निर्णय घेतला होता. ठाकरे – पवार भेटीनंतर हा गोंधळ निवडल्याचे दिसते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER