कर्नाटकव्याप्त मराठी भाषिक गावांना महाराष्ट्रात सामावून घेण्यासाठी पवारांचा पुढाकार

Sharad Pawar

मुंबई : मागील काही दिवसांपासून कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्न अधिकच चिघळला आहे. १७ जानेवारी रोजी महाराष्ट्रात समाविष्ट होण्यासाठी प्राणपणाला लावणाऱ्या सीमा लढ्यातील हुतात्म्यांना हुतात्मा दिनी अभिवादन करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलेल्या विधानाने आणखी वातावरण तापले आहे.

कर्नाटकव्याप्त बेळगाव, कारवार, बिदर, भालकीसह कर्नाटक सीमाभागातील सर्व मराठीभाषक गावे महाराष्ट्रात सामील करुन घेण्यासाठी आता राष्ट्रवादी काँगेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पुढाकार घेतला असून, येत्या २७ जानेवारीला महत्वाची बैठक बोलावली आहे. विशेष म्हणजे या बैठकीत विरोधी पक्षातील नेत्यांचीही मत पवार जाणून घेणार आहे. विसंधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनाही बोलवण्यात आले आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे, छगन भुजबळ उपस्थित राहणार आहेत. आता या बैठकीत शरद पवार सीमाप्रश्नी कुठला तोडगा काढतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER