खडसेंच्या पक्षांतरानंतर पवारांचा पहिला उत्तर महाराष्ट्र दौरा; आज नाशिकमध्ये

Sharad Pawar

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आज नाशिक (Nashik) दौ-्यावर आहेत.तेथे ते स्वर्गीय विनायक दादा पाटील यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत.

ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, लेखक, साहित्यिक विनायकदादा पाटील यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. कोरोनावर मात केल्यानंतरही अचानक प्रकृती ढासळून त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभलेला एक नेता काळाच्या पडद्याआड गेला. त्यांच्या निधनानंतर शरद पवार यांनी ट्विटरवरून त्यांना श्रद्धांजली वाहिली होती. आज ते स्वतः नाशिकमध्ये त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सात्वन करतील.

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या पक्षांतरानंतर शरद पवारांचा हा पहिला उत्तर महाराष्ट्र दौरा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER