शेतकऱ्यांसाठी ३९ वर्षांपूर्वी पवारांची कृषी दिंडी, झाली होती राजकीय उलथापालथ

sharad Pawar

जळगाव :- मोदी सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात मागील १० दिवसांपासून दिल्ली येथे पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला सर्वच विरोधी पक्षांनी पाठिंबा जाहीर केला आहे. माजी
केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीही शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला असून, या निमित्ताने त्यांनी ३९ वर्षांपूर्वी केलेल्या शेतकरी आंदोलनाला उजाळा मिळाला आहे. शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी जळगाव ते नागपूर काढलेल्या शेतकरी दिंडी ला आज ३९ वर्षे पूर्ण होत आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी शरद पवार यांची तळमळ आज कायम असून पंजाब हरियाणा दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनासाठी ते उद्या राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत. त्यांचा शेतकऱ्यांसाठी लढा आजही सुरूच आहे.

शरद पवारांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी जळगाव ते नागपूर (Nagpur) अशा शेतकरी दिंडीचे आयोजन केले होते. नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनावर विधिमंडळावर ही दिंडी धडक देणार होती. ७ डिसेंबर १९८० या दिवशी जळगाव येथील नूतन मराठा महाविद्यालयाच्या मैदानावर शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली या दिंडीला प्रारंभ झाला होता. आज या दिंडीला ३९ वर्षे पूर्ण होत आहेत. या दिंडी मुळे त्यानंतर राज्यातील राजकारणात बरीच उलटापालथ झाली होती. शरद पवार यांनी त्या वेळी विरोधकांचे एकीकरण केले होते. त्यामुळे या शेतकरी दिंडीत तत्कालीन दिग्गज नेते ग.प्र. प्रधान, बाबा आढाव, शिवाजीराव देशमुख, एन.डी. पाटील, गणपतराव देशमुख, एस.एम. जाेशी, राजारामबापू पाटील, प्रभा राव, प्रतिमा दंडवते, नानासाहेब गोरे, बापूसाहेब काळदाते, जाॅर्ज फर्नांडिस, मृणाल गोरे, गोविंदराव आदिक, ए.बी. वर्धन, अरुण मेहता, हे नेते सहभागी झाले होते.

ही बातमी पण वाचा : शरद पवार ‘वाहत्या गंगेत’ हात धुवून घेतायत? कृषी कायद्यात मोठ्या बदलाची गरज व्यक्त करणारे पत्र व्हायरल

तर स्थानिक स्तरावर ना.धों महानोर, ईश्वरलाल जैन, मू.ग.पवार, प्रल्हादराव पाटील आदी नेते सहभागी झाले होते. तब्बल ४७५ किलोमीटर पायी प्रवास करून ही दिंडी नागपूर येथे पोहचली त्यावेळी यशवंतराव चव्हाण सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांना. ही अटक करण्यात आली होती. या आंदोलनामुळे संपूर्ण देश ढवळून निघाला होता. याच आंदोलनाची प्रेरणा घेऊन पुढे दिल्ली येथे मोठे देशव्यापी किसान आंदोलन झाले..त्याचे नेतृत्व ही त्यावेळी शरद पवार यांनीच केले होते.

आज ज्याप्रमाणे सिनेकलाकार शेतकरी आंदोलन पाठिंबा देत आहे त्याप्रमाणे त्या काळातही अभिनेत्यांनी शरद पवार यांच्या शेतकरी दिंडीला पाठिंबा दिला होता. हिंदी अभिनेते दिलीपकुमार, जब्बार पटेल, निळू फुले, डाॅ.श्रीराम लागू ही मंडळीही दिंडीत सहभागी होण्यासाठी नागपूर कडे निघाली होती. मात्र शरद पवार यांनी त्यांना न येण्याचा निरोप दिल्यामुळे ही मंडळी यावेळी सहभागी झाली नाहीत. शरद पवार यांच्या शेतकरी दिंडीस आज ३९ वर्षे पूर्ण होत असतानाच आज शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी दिल्ली येथे पंजाब व हरियाणाच्या शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला शरद पवार यांनी पाठिंबा दिला आहे. एवढेच नव्हे तर याबत ते विरोधकांचे शिष्टमंडळ घेऊन राष्ट्रपती कोविंद यांची ९ डिसेंबर रोजी भेट घेणार आहेत. पवार यांचा शेतकऱ्यांसाठी लढा आजही सुरूच असल्याचे दिसून येत आहे.

ही बातमी पण वाचा : शरद पवार शेतकरी नेते, ते शेतकऱ्यांच्या नुकसानीचा विचारही करणार नाही – संजय राऊत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER