अडचणीत सापडलेल्या सरकारच्या मदतीसाठी पवारांची एंट्री; अजितदादांना केल्या सूचना

Ajit Pawar - Sharad Pawar

मुंबई :- यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. तर दुसरीकडे जवळपास १० दिवस चालणाऱ्या या अधिवेशनातील बराच कालावधी मनसुख हिरेन मृत्युप्रकरणाने (Mansukh Hiren death case) गाजला. या प्रकरणामुळे महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार चांगलेच अडचणीत सापडले आहे. भाजप नेत्यांनी मनसुख हिरेन मृत्युप्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वझे यांच्या निलंबनाची आणि अटकेची मागणी उचलून धरली आहे.

अखेर अडचणीत सापडलेल्या सरकारला यातून बाहेर काढण्यासाठी आता थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हस्तक्षेप केला आहे. विधानसभेत विरोधी पक्षाकडून सचिन वझे यांच्या निलंबनाच्या आणि अटकेच्या मागणीवरून चांगलाच गदारोळ झाला. त्यामुळे सरकारला बॅकफूटवर यावे लागले. परंतु सरकारला या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी शरद पवार (Sharad Pawar) यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यासोबत दूरध्वनीवरून चर्चा केल्याची माहिती पुढे आली आहे.

या प्रकरणावरून सरकारने आज कुठली भूमिका घ्यायची याबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आज अर्थसंकल्प मंजूर करून घेणे हीच भूमिका सत्ताधारी पक्षाची ठेवावी, अशी सूचना पवारांनी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दरम्यान, राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे आज सूप वाजणार आहे. १ ते १० मार्च अशा १० दिवसीय अधिवेशनात ८ दिवसांचे कामकाज होते. त्यातला आजचा शेवटचा दिवस आहे. आजच्या दिवसभरात सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे विधानसभेत अर्थसंकल्पावर चर्चा असणार आहे.

यात खातेनिहाय चर्चा होणार आहे. २४ खात्यांबद्दल चर्चा होणं अपेक्षित आहे. याशिवाय विरोधी पक्षातर्फे नियम २९६ अन्वये मांडण्यात आलेल्या कायदा आणि सुव्यवस्था या विषयावर चर्चेला गृहमंत्री अनिल देशमुख हे उत्तर देतील. याशिवाय नियम २९२ अन्वये विरोधी पक्षाचा अंतिम आठवडा प्रस्ताव आहे, त्यावरही चर्चा अपेक्षित आहे.

भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारचा महत्त्वांकांक्षी प्रकल्प असलेल्या ३३ कोटी वृक्ष लागवड विशेष मोहिमेची विधिमंडळाच्या संयुक्त समितीमार्फत चौकशी केली जाणार असल्याची घोषणा सरकारतर्फे केली गेली होती. त्या समितीचीही आज स्थापना केली जाणार आहे. हे असं सगळं कामकाज जरी कागदावर दिसत असलं तरीही प्रत्यक्ष दोन्ही सभागृहांत केवळ मनसुख हिरेन प्रकरणावरून चर्चा आणि गोंधळ झाल्याचे बघायला मिळाले. शेवटी सरकारला पोलीस अधिकारी सचिन वझे (Sachin Vaze) यांचे निलंबन करावे लागले.

ही बातमी पण वाचा : सचिन वाझेंवरुन सत्ताधारी बॅकफूटवर ; संकटमोचक शरद पवार पुन्हा आले धावून ‘हा’ दिला महत्वाचा सल्ला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER