पवारांचं ठरलं ; पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी पार्थ पवारांना उमेदवारी, मात्र अजितदादा संभ्रमात

Sharad Pawar & Parth Pawar

मुंबई :- काल राजधानी दिल्लीमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थानी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत पंढरपूर पोटनिवडणुकीबाबत (Pandharpur by-election) चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. या बैठकीत पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी पार्थ पवार यांच्या नावाची चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. स्थानिक पातळीवरुन पार्थ पवार यांच्या उमेदवारीचा आग्रह धरला जात असल्याने शरद पवारही त्यांना उमेदवारी देण्यास अनुकूल असल्याचे सांगितले जात आहे. मात्र पार्थ यांचे वडील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) तयार नसल्याचे बोलले जात आहे.

भारत भालके यांच्या अकाली निधनामुळे पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक होणार आहे. महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) पंढरपूरची जागा राष्ट्रवादी लढवणार आहे. अशावेळी उमेदवार निवडीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या उपस्थितीत पंढरपुरात एक बैठक पार पडली. मात्र यावेळी भगीरथ भालकेंना उमेदवारी ना देण्याची मागणी कार्यकर्त्यांनमधून केली गेली. त्यामुळे भगीरथ भालके समर्थकांनी या कार्यकर्त्याला मारहाण केली होती. पंढरपूरमधील ही बैठक आटोपल्यानंतर अजितदादा आणि जयंत पाटील तातडीने दिल्लीला रवाना झाले. 6 जनपथवरील पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या नेत्यांची जवळपास अडीच तास बैठक पार पडली.

बैठक पार पडल्यानंतर जंयत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीत पंढरपूरमधून पार्थ पवार यांच्या नावाचाही विचार करण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती पुढे आली आहे. स्थानिक पातळीवर पार्थ यांच्या उमेदवारीसाठी कार्यकर्त्यांनी आग्रही भूमिका घेतली आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी तसा ठरावही केल्याचं सांगण्यात येत आहे. पण पार्थ यांना पंढरपुरातून उमेदवारी देण्याबाबत अजित पवार तयार नसल्याची माहिती पुढे आली आहे.

ही बातमी पण वाचा : अखेर राष्ट्रवादीचे ठरले ; अनिल देशमुखांच्या राजीनाम्यासंदर्भात भूमिका स्पष्ट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER