पवारांचा निर्णय : गृहमंत्रिपद दिलीप वळसे पाटील तर उत्पादन शुल्क खाते अजितदादांकडे

Sharad Pawar - Ajit Pawar - Maharastra Today

मुंबई :- गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची चौकशी होणार असल्याने अखेर अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर त्यामुळे आता गृहमंत्रिपदाची जबाबदारी कुणाकडे दिली जाणार? असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपले विश्वासू दिलीप वळसे पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती मिळाली आहे. तसेच मंगळवारी गृहमंत्री म्हणून पदभार स्वीकारणार अशी माहिती मिळत आहे.

तर वळसे पाटील यांच्याकडे असलेले उत्पादन शुल्क खाते उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे तर कामगार खाते हसन मुश्रीफ यांच्याकडे सोपवले जाणार असल्याची खात्रीलायक माहिती पुढे आली आहे. दरम्यान, अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर आता गृहमंत्रिपदाची जबाबदारी कुणाकडे सोपवली जाणार, असा प्रश्न विचारला जात आहे.

अशा वेळी गृहमंत्रिपदासाठी राष्ट्रवादीकडून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील (Jayant Patil), उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार आणि उत्पादन शुल्क आणि कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. त्याचबरोबर ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांचंही नाव समोर येतंय. तसंच हसन मुश्रीफ हे तातडीने मुंबईकडे रवाना झाल्याचीही माहिती पुढे आली आहे.

ही बातमी पण वाचा : देशमुखांचा राजीनामा, शरद पवारांच्या आदेशानंतर मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button