पवारांचा निर्णय : विधानपरिषदेसाठी एकनाथ खडसे, आनंद शिंदे, राजू शेट्टी, आणि श्रीराम सरोदे?

Sharad Pawar - Eknath Khadse - Anand Shinde

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त जागांसाठी अखेर पक्षाध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी संमती दिल्याची माहिती सूत्रांद्वारे मिळाली आहे. विधान परिषदेच्या एकूण १२ जागांपैकी शिवसेना (Shiv Sena),राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेस (Congress) या प्रत्येकी पक्षाला ४ जागा येणार आहेत. राष्ट्रवादीच्या कोट्यातील ४ जागांवर कोणाला संधी दिली जाणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. यापैकी एका जागेवर भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्या एकनाथ खडसे यांना संधी मिळणार आहे. तर उर्वरित ३ जागांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी (Raju Shetti), गायक आनंद शिंदे (Anand Shinde) आणि श्रीराम सरोदे (Shriram Sarode) यांना संधी दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

तर काँग्रेसची नावेही निश्चित झाल्याची माहिती पुढे आली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत याना विधानपरिषदेवर पाठवण्याचा निर्णय झाल्याची माहिती पुढे आली आहे. त्यांच्यासोबत सत्यजित तांबे, मोहन जोशी आणि माजी राज्यमंत्री नसीम खान यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती पुढे आली आहे. उद्या होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या नावांना मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. तर शिवसेनेकडून अद्यापही उमेदवारांची चाचपणी सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे.

मागच्या कॅबिनेट बैठकीआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यात बैठकही झाली देखील झाली होती. मात्र ऐनवेळी प्रस्ताव न आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. परंतु, आता राज्यपाल नियुक्त १२ नावांना मंत्रिमंडळाची मंजूरी देऊन ती नावं मंजूरीसाठी राज्यपालांकडे पाठवली जाणार आहेत. महाविकास आघाडी आणि राज्यपाल यांच्यात झालेल्या संघर्षानंतर राज्यपाल या नावांना पसंती देणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सर्वात महत्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे यांचे नाव असणार का? याबाबत देखील राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. मात्र अद्याप एकनाथ खडसेंचं नाव निश्चित झालं नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अंतिम क्षणी खडसेंचं नाव येणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस प्रत्येकी चार नाव देणार आहेत.

राज्यपाल नियुक्त १२ जागांसाठी महाविकास आघाडीतील ही नावं चर्चेत :

शिवसेना :

सुनिल शिंदे, माजी आमदार
सचिन अहिर, माजी मंत्री
मिलिंद नार्वेकर, सचिव
राहुल कनाल, युवा सेना
विजय आप्पा करंजकर ( जिल्हाप्रमुख ) ना.
भाऊसाहेब चौधरी (संपर्कप्रमुख ) नाशिक
नितिन बानगुडे पाटील, उपनेते
अर्जुन खोतकर, माजी मंत्री

राष्ट्रवादी काँग्रेस :

एकनाथ खडसे
राजू शेट्टी
श्रीराम शेटे
आनंद शिंदे
उत्तमराव जानकर
आदिती नलावडे
शिवाजी गर्जे

काँग्रेस :

सचिन सावंत
सत्यजित तांबे
मोहन जोशी
नसीम खान

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER