देशमुखांच्या राजीनाम्यानंतर गृहमंत्रिपदासाठी पवारांचे विश्वासू हसन मुश्रीफ यांचे नाव चर्चेत

Sharad Pawar - hasan mushrif - Maharastra Today

मुंबई :- उच्च न्यायालयाने अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांची सीबीआय चौकशीला परवानगी दिल्यानंतर त्यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर हे पद हसन मुश्रीफ यांच्याकडे सोपवले जाणार असल्याचा दावा भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केला आहे. एकीकडे गृहमंत्रिपदासाठी राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेते जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील यांच्या नावांची चर्चा असताना या शर्यतीत अचानक हसन मुश्रीफ यांच्या नावाची एन्ट्री झाली आहे.

उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांच्यावरील आरोपाचा तपास सीबीआयकडे सोपवल्यानंतर हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) तातडीने मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याचे समजते. त्यामुळे आता सुधीर मुनगंटीवारांचा दावा कितपत खरा ठरणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. राष्ट्रवादीचा मुस्लिम चेहरा आणि शरद पवारांचे (Sharad Pawar) खंदे समर्थक एवढीच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची ओळख नाही, तर कोल्हापूर आणि कागलच्या विकासात त्यांचा मोठा वाटा आहे. सलग पाचव्यांदा निवडून येऊन ते कागलकरांच्या मनातील हिंदकेसरीही ठरले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button