कॅन्सरग्रस्तांच्या कुटुंबीयांबाबत पवारांची तळमळ, याच आठवड्यात घरांच्या चाव्या सोपवणार

Sharad Pawar - Maharastra Today

मुंबई : मुंबईतील टाटा कॅन्सर रुग्णालयात राज्यासह देशभरातून हजारो रुग्ण येतात. त्यांच्यातील अनेकांना निवासाची सोय नसल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना अनेकदा रस्त्यावर, फूटपाथवर रात्र काढावी लागल्याचे आपण पाहिले किंवा ऐकले असेल. पण आता ती वेळ येणार नाही. कारण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या सूचनेनुसार गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ‘म्हाडा’चे १०० प्लॅट्स टाटा कॅन्सर हॉस्पिटलला देण्याची घोषणा मागच्या महिन्यात केली होती. मात्र त्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णानालयात तीन शस्त्रक्रिया करण्यात आल्याने घोषित फ्लॅट्सचे हस्तांतरण लांबणीवर गेले होते.

मात्र काही दिवसांच्या विश्रांतीनंतर आता शरद पवारांनी कामकाजास सुरूवात केली असून, काल जितेंद्र आव्हाड यांना याच आठवड्यात फ्लॅटच्या चाव्या सोपवणार असल्याचे सांगितले आहे. याबाबतची माहिती जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी दिली आहे. काल अचानक शरद पवारांशी भेट झाली. त्यांनी पहिला प्रश्न विचाराला. कॅन्सर पेशंटच्या नातेवाईकांना जी घरे द्यायची होती त्याच काय झालं. यावर आव्हाडांनी पवारांना सांगितले की, घरे तयार आहेत. चाव्या देखील हातात आहेत. फक्त त्या त्यांना द्यायच्या आहेत. मग पवार म्हणाले उशीर कशाला. आव्हाड म्हणाले आपल्या तारखेची वाटत पाहतोय. त्यानंतर पवार म्हणाले ठिक आहे. या आठवड्यामध्ये हा कार्यक्रम करूयात. पहिले त्यांना घरे दिली पाहिजेत.

Disclaimer:-बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button