‘पवारांना बारवाल्यांची चिंता, यासाठी ठाकरे सरकारचा अत्यंत पुरोगामी निर्णय’, भाजपचा टोला

Sharad Pawar - CM Uddhav Thackeray - Atul Bhatkhalkar

मुंबई : चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यामध्ये लागू करण्यात आलेली दारूबंदी अखेर महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi) उठवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. गुरुवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात वाढत असलेली गुन्हेगारी आणि अवैध दारूविक्री या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याचं स्पष्ट केलं आहे. मात्र, त्यावरून आता विरोधकांनी राज्य सरकारला लक्ष्य करायला सुरुवात केली आहे. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना लक्ष्य केले आहे.

‘नेहरूंच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून आणि जाणत्या पवारांना बारवाल्यांची असलेली कळकळ लक्षात घेऊन ठाकरे सरकारने चंद्रपूरमध्ये दारुबंदी उठवण्याचा अत्यंत पुरोगामी निर्णय घेतला आहे. अवघे ठाकरे सरकार सतत ‘मद्या’च्या धुंदीत असल्यामुळे अवघ्या कारभाराची स्थिती हलेडूले झाली आहे’, असा खरमरीत टोला भातखळकर यांनी लगावला आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button