बालपणापासूनच पवारांची कॉलर टाईट, त्यांनी महाराष्ट्र उभा केला – जितेंद्र आव्हाड

sharad pawar and jitendra awhad

मुंबई :मुंबई महापालिकेने अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) हिच्या कार्यालयावर महापालिकेने अतिक्रमण विरोधी कारवाई केल्यानंतर कंगना रानौत अधिकच संतापली आहे. कालपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिवसेनेला टार्गेट करणाऱ्या रानौतने आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना लक्ष्य केले आहे. पवारांनी अवैध बांधकाम केल्याचा गौप्यस्फोट एका पत्रकाराने केला होता. मात्र ते प्रकरण दाबण्यात आले. एक बिल्डिंग इश्यू ज्याचा बिल्डरने सामना करण्याची आवश्यकता आहे. आणि ही इमारत शरद पवारांची आहे जी आम्ही विकत घेतली. माझ्या जोडीदाराचा फ्लॅट आहे का ? त्याचे उत्तर हवे आहे. मग ते बांधकाम त्यांच्या पार्टनरचे होते काय? असा प्रश्न कंगनाने उपस्थित केला आहे. यावर आता राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

लहापणापासूनच आमची कॉलर टाईट (collar tight ) आहे असे म्हणत आव्हाड यांनी पवारांचा बालपणीचा फोटो पोस्ट केला आहे. शरदचंद्रजी पवार साहेबांनी महाराष्ट्र उभा केला, बांधला. हे संपूर्ण महाराष्ट्राला माहितीये. पण जीला महाराष्ट्राबाबत काहीच माहीत नाही ती म्हणते त्यांनी बिल्डिंग बांधली. पण जीला महाराष्ट्राबाबत काहीच माहीत नाही ती म्हणते त्यांनी बिल्डिंग बांधली. असे म्हणत त्यांनी मानसिकरोगी म्हणून टॅग केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER