खडसेंना पक्षात घेण्यास पवारांचा सावध पवित्रा; भेटणार नसल्याचे स्पष्टीकरण

Sharad Pawar & Eknath Khadse

मुंबई : पक्षासोबत नाराज असलेले भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath khadse) लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशी चर्चा आहे. त्यासाठी येत्या १० तारखेचा मुहूर्त ठरल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये झळकल्या. आजच खडसे-पवारांची भेट होणार असल्याची शक्यताही वर्तवली जात होती. आता मात्र खुद्द शरद पवार (Sharad Pawar) यांनीच हे सगळं वृत्त खोडून काढलं आहे.

याबाबत शरद पवारांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, एकनाथ खडसेंसोबत कोणत्याही भेटीचं नियोजन नाही. तसंही उद्या मी दिल्लीला जाणार आहे. परंतु आजच्या भेटीचे कुठलेही नोयोजन नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. यावरून शरद पवार खडसेंना पक्षात घेण्यासाठी सावध पवित्रा घेत असल्याचे सांगितले जात आहे. एकीकडे पक्षातील नेते खडसेंना पक्षात घेण्यास उत्सुक असताना पवारांच्या  आजच्या भूमिकेमुळे खडसेंच्या पक्षप्रवेशावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

दरम्यान, एकनाथ खडसे आज मुंबईत आहेत. वैद्यकीय तपासणी आणि उद्या होणाऱ्या पक्षाच्या बैठकीत उपस्थित राहण्यासाठी आपण मुंबईत आल्याचं खडसेंनी सांगितलं. त्याचसोबत मी लपून छपून कोणाची भेट घेणार नाही, वैद्यकीय तपासणीनंतर अजून कुणाला भेटावं हे ठरलेलं  नाही असं म्हणत त्यांनी आणखीनच संभ्रम वाढवला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER