राज ठाकरेंबाबत पवारांचे मोठे विधान, म्हणाले… राज ठाकरेंना तरुण वर्गाचा मोठा पाठिंबा

raj-thackeray-sharad-pawar

मुंबई :- राज्यातील सध्या सुरु असलेल्या राजकीय परिस्थितीवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray)यांच्या राजकीय भवितव्याबाबत मोठे विधान केले आहे. राज ठाकरे यांच्यामागे मोठा तरुण वर्गाचा पाठिंबा असून, तो कायम राहणार असल्याचे विधान पवार यांनी केले आहे.

शरद पवार यांचा १२ डिसेंबरला वाढदिवस आहे. या पार्श्वभूमीवर विजय दर्डा यांनी मुलाखत घेतली. या मुलाखतीत दर्डा यांनी राज ठाकरेंच्या राजकीय वाटचालीबाबत प्रश्न विचारला असता, पवार म्हणाले की, मुंबई (Mumbai) आणि महाराष्ट्र नेहमीच देशाचा विचार करतो. देशातील अनेक लोक मुंबईसह राज्यात गुंतवणूक करत असतात. योगी यांनी मुंबईचा दौरा करुन चित्रपट क्षेत्रातील लोकांना उत्तर प्रदेशात गुंतवणूक करण्यासाठी साद घातली आहे. मात्र मुंबई आणि महाराष्ट्र दुबळा होईल यावर माझा विश्वास नाही.

परराज्यातील लोकांना महाराष्ट्रात मोठ्याप्रमाणात रोजगार मिळतो हे वास्तव आहे. सध्या महाविकास आघाडीचे सरकार आहे. सुकाणू समितीच्या माध्यमातून तिन्ही पक्षात योग्य समन्वय आहे. सुकाणू समिती माझ्या हातात नसून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हातात आहे. त्यामुळे सगळं व्यवस्थित सुरू आहे. राज ठाकरेंचा स्वतंत्र पक्ष आहे. ते स्वतंत्रपणे आपले मत मांडतात. त्यांना पाठिंबा देणारा तरुणांचा एक मोठा वर्ग आहे. निवडणुकांमध्ये त्यांना अपेक्षित यश मिळत नसले तरी, त्यांच्या बद्दलचे आकर्षण कमी झाले नाही. ते आकर्षण पुढेही कायम राहील, असा दावाही त्यांनी केला.

ही बातमी पण वाचा : राहुल गांधींच्या नेतृत्वात सातत्य नाही : शरद पवार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER