पवारांची मोठी खेळी, राष्ट्रवादीला विधानसभेचं अध्यक्षपद मिळवण्यासाठी केले सूचक विधान

Sharad Pawar - NCP

मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी नाना पटोले यांचे नाव निश्चित झाल्याने काँग्रस नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर आता विधानसभेचं अध्यक्षपद मिळवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष इच्छूक आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोठे विधान केले आहे. विधानसभेचा नवा अध्यक्ष निवडण्यासाठी आता पुन्हा तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची चर्चा होईल, असे त्यांनी म्हटले. त्यामुळे शरद पवारांकडून (Sharad Pawar) या पदासाठी आता जोर लावला जाणार, असे संकेत मिळत आहेत.

दरम्यान, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षबदलाबरोबरच ठाकरे सरकारच्या मंत्र्यांचे खातेबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेनेने विधानसभा अध्यक्षपद स्वत:कडे ठेवून काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे काँग्रेसमध्ये उपमुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. तसेच उपमुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, नितीन राऊत आणि विजय वडेट्टीवार यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER