सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करण्यासाठी पवारांचे प्रयत्न, भाजप नेत्याचा दावा

Supriya Sule - Sharad Pawar - Nilesh Rane

मुंबई : सुशांतसिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) बहिणी प्रियांका सिंह आणि मितू सिंह यांच्याविरुद्ध तक्रारीच्या आधारेच एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे हा एफआयआर दाखल करून सीबीआयच्या तपासात आडकाठी आणण्याचा प्रयत्न झाला असे जे म्हणणे आहे ते निरर्थक आहे, असे मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) मुंबई हायकोर्टात (Bombay High Court) प्रतिज्ञापत्रावर सांगितले आहे. आणि यावरून भाजपचे (BJP) नेते आणि माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी एक धक्कादायक विधान केले आहे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पोलिसांना प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश देऊन सुप्रिया सुळेंना (Supriya Sule) मुख्यमंत्री करण्यासाठी बेस तयार केला, असा दावा निलेश राणे यांनी केला आहे.

निलेश राणे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, मुंबई पोलिसांना प्रतिज्ञापत्र द्यायला लावून पवार साहेबांनी नुस्त सीबीआयला (CBI) डिवचलं नाही तर ह्या २ एजन्सी आपसात भिडले की शिवसेना टेन्शन मध्ये येईल त्यांना माहीत आहे. सुळेना मुख्यमंत्री करण्यासाठी बेस तयार केला जात आहे, असे खळबळजनक विधान राणे यांनी केले आहे.

दरम्यान, मुंबई हायकोर्टात प्रतिज्ञापत्रावर सांगितले आहे की, मुंबई पोलिसांनी अभिनेता सुशांतसिंह राजपूतची गर्लफ्रेण्ड रिया चक्रवर्ती हिने सुशांतच्या दोन्ही बहिणींविरुद्ध तक्रार केली होती. त्याआधारे वांद्रे पोलीस ठाण्यात गेल्या महिन्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यावर काही दिवसांपूर्वीच सीबीआयने आक्षेप घेतला होता. कायदेशीर अंगाने हा एफआयआर चुकीचा असल्याचे सीबीआयचे म्हणणे होते. या अनुषंगाने वांद्रे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक निखील कापसे यांच्यामार्फत मुंबई हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे. त्यात या एफआयआरमुळे गुन्हा उघड झाला आहे, असा दावा पोलिसांनी केला आहे. या माध्यमातून सीबीआय तपासात अडथळा आणण्याचा कोणताही प्रयत्न केला जात नसल्याचेही पुढे नमूद करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER