पवारांचा सल्ला पारनेरसाठी ठरला वरदान, सरकारने नव्हे तर, राष्ट्रवादीच्या आमदाराने करुन दाखवले

Sharad Pawar - Covid Beds - Maharastra Today

अहमदनगर : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दररोज मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांना बेड मिळणं कठीण होऊन बसलं आहे. अनेक रुग्णालयांना ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. अशात राज्यातील महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारकडून कोविड रुग्णालये सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी वर्षभरापूर्वी दिलेला सल्ला पारनेर तालुक्यासाठी वरदान ठरला आहे.

सलग दुसऱ्या वर्षी देशासह राज्यात कोरोनाची लाट आलेली आहे. त्यामुळे गेल्या वर्षीपेक्षाही आताची परिस्थिती गंभीर आहे. या अस्मानी संकटात आमदार निलेश लंके यांनी शरद पवारांनी दिलेल्या सल्ल्यानुसार भाळवणीत एक हजार बेडचे शरदचंद्र पवार कोविड सेंटर उभारून जनसामान्यांना आधार दिला आहे. एकीकडे राज्य सरकार कोविड सेंटर उभारण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत, तर लंके यांच्या कोविड सेंटरमध्ये मोठ्याप्रमाणात रुग्ण दाखल झाले असून, त्यांच्यावर उपचारही सुरू झाले आहेत.

लंके म्हणाले, मागच्या वर्षीची परिस्थिती व आजची परिस्थिती भयंकर आहे. दिवसेंदिवस कोरोना परिस्थिती गंभीर होत चालली असून ऑक्सिजन, रेमडेसिविर, बेडचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे थोडी फार जरी लक्षणे आढळली तर नागरिकांनी तपासणी केली तर घरच्या घरीच या आजारातून बरे होता येईल. प्रत्येकाने आपली व आपल्या कुटुंबात काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. कोविड सेंटरसाठी मोफत मंगल कार्यालय उपलब्ध करून देणाऱ्या भुजबळ कुटुंबीयांचेही लंके यांनी कौतुक केले.

ह्या सर्व रुग्णांना व्यवस्थित औषध उपचार,जेवणाची सोय व कोणत्या रुग्णाला काही समस्या आहे का या बाबत दिवसभर कोव्हिडं सेंटरला बसून संपूर्ण आढावा घेतला. कोव्हिडं सेंटर मधील माझ्या कुटुंबातील सर्व माझ्या रुग्ण बांधवांना आधार देऊन घाबरून न जाता तुम्हाला कोणती अडचण आली तर त्याबाबत मला माहिती देत चला. तुम्हाला जी काही मदत लागेल ती १००% मिळून देण्यासाठी मी सदैव तत्पर राहील, अशी ग्वाही लंके यांनी दिली.

शरदचंद्र पवार कोविड सेंटरमध्ये १०० बेड ऑक्सिजनचे असतील. प्रत्येक रुग्णांसाठी स्वतंत्र थर्मास, मास्क, स्टीमर ,पाणी बॉटल, नॅपकिन,साबण आदी मूलभूत सुविधा दिल्या जाणार आहेत. २४ तास पिण्यासाठी व अंघोळीसाठी गरम पाणी ,सकस जेवण, दूध ,अंडी ,सूप आदींचा समावेश असेल. दररोज मोठ्या स्क्रीनवर योगाचे प्रात्यक्षिक दाखवण्यात येणार आहे. तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार योग्य ते काढे दिले जाणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button