शेतकरी आंदोलनाला यशस्वी करण्यासाठी पवारांची मोठी रणनीती

Sharad Pawar

मुंबई : मोदी सरकारच्या (Modi Government) कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेले शेतकरी आंदोलन अंतिम टप्प्यावर पोहोचले असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) हे सक्रिय झाले आहेत. या आंदोलनासंदर्भात आपण देशातील इतर पक्षांशी बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आता शरद पवार शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी भाजप (BJP) विरोधकांची मोट कशी बांधणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शरद पवार यांनी शनिवारी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतकरी आंदोलन आणि कृषी कायद्यांसंदर्भात भूमिका स्पष्ट केली. दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनासंदर्भात मी इतर पक्षांसोबत चर्चा करणार आहे. यापूर्वी आम्ही पाच ते सहा राजकीय पक्षांनी एकत्र येऊन राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांची भेट घेतली होती. आम्ही केंद्र सरकारला कृषी कायदे मागे घेण्यासंदर्भात सांगितलेच आहे, असे पवार यांनी सांगितले. त्यामुळे आता शरद पवार यांच्या या भूमिकेचे राष्ट्रीय स्तरावर कशाप्रकारे पडसाद उमटणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, गेल्या 12 दिवसांपासून चिल्ला सीमेवर सुरु असलेले आंदोलन शेतकऱ्यांकडून मागे घेण्यात आले आहे. केंद्र सरकारच्यादृष्टीने हे मोठे यश मानले जात आहे. काही शेतकऱ्यांनी शनिवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर संबंधित शेतकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेत दिल्ली-नोएडा सीमा खुली केली. तर दुसरीकडे उर्वरित शेतकरी संघटनांनी केंद्र सरकार लक्ष देत नसल्याचे म्हणत आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. त्यासाठी प्रमुख शेतकरी संघटनांचे प्रमुख नेते सोमवारी उपोषण करणार आहे. तर रविवारी दिल्ली-जयपूर महामार्गावर हजारो शेतकऱ्यांकडून ट्रॅक्टर मोर्चा काढला जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER