पवारांना हे झेपणार नाही, कारण ते कोलांट्या मारण्याइतके सोपे नाही; भाजपची मिस्कील टीका

Atul Bhatkalkar & Sharad Pawar

खासदार संभाजीराजे छत्रपती आणि छत्रपती उदयनराजे हे दोन्ही छत्रपती भाजपाच्या पाठिंब्यावर राज्यसभेत गेले आहेत. त्यामुळे ते त्यांचीच भाषा बोलत आहेत. दोन्ही राजांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न भाजपाकडूनच सोडवून घ्यावा, अशी कोपरखळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मारली होती. भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी शरद पवार यांच्यावर मिस्कील टीका केली आहे.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी भाजपा कटिबद्ध आहेच. आम्ही शर्थीने प्रयत्न करू. पवारांना हे झेपणारही नाही; कारण ते कोलांट्या मारण्याइतके सोपे नाही, अशी टीका भातखळकर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी एक ट्विट केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER