मोदी सरकारला घेरण्यासाठी आज पवार दिल्लीत, विरोधकांची बोलवली बैठक

Sharad Pawar

मुंबई : केंद्र सरकारने लागू केलेल्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब आणि हरियाणातील शेतकरी राजधानी दिल्लीत गेल्या दिड महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. कायदा रद्द करण्याच्या मागणीवर ठाम असून, केंद्र सरकार कायदा लागू करण्यावर ठाम आहे. त्यामुळे शेतकरी आंदोलन अधिकच चिघळण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला घेरण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी हालचाली सुरू केल्या आहेत.

शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केल्यापासून शरद पवार आज दुसऱ्यांदा दिल्लीत दाखल होत आहे. शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरून त्याची विरोधी पक्षातील नेत्यांची बैठक बोलवली असून, केंद्र सरकारच्या विरोधात मोठी रणनीती आखण्यात येणार आहे. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार आहे. यात भारतीय कम्यूनिस्ट पक्ष, काँग्रेस यांसह अनेक विरोधी पक्षाचे नेते सहभागी होण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER